Home महाराष्ट्र Dhananjay Munde : 'आजारी असताना बहिणीनं फोन केल्याचा आनंद वाटला' - NCP...

Dhananjay Munde : ‘आजारी असताना बहिणीनं फोन केल्याचा आनंद वाटला’ – NCP Leader Dhananjay Munde Shares His Experience Of Battling Coronavirus


मुंबई: ‘माझ्या आजारपणाच्या काळात बहीण पंकजा हिनं फोन केला आणि सदिच्छा दिल्या, याचा आनंद वाटला,’ अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली.

आणखी वाचा: ‘राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आलीय, पण लक्षात ठेवा…’

धनंजय मुंडे यांनी नुकतीच करोनावर मात केली आहे. करोनाची लागण झाल्यानंतर दहा दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले मुंडे काही दिवसांपूर्वी घरी परतले असून सध्या क्वारंटाइन आहेत. क्वारंटाइन असतानाच त्यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला आणि आजारपणाचे अनुभव सांगितले. त्यात अर्थातच पंकजा यांनी फोन करून त्यांच्याशी केलेल्या चर्चेचाही उल्लेख होता.

धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळताच पंकजा यांनी तातडीनं त्यांना फोन केला होता. ‘बंधू तब्येतीची काळजी घे आणि लवकर बरा होऊन घरी ये,’ अशा सदिच्छा पंकजा यांनी व्यक्त केल्या होत्या. त्याबद्दल विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले, ‘आमच्यात संघर्ष झाला होता. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. असं असतानाही बहिणीचा फोन आल्याचा आनंद झाला.’

आणखी वाचा: पडळकरांच्या पवारांवरील टीकेबाबत शिवसेनेला ‘ही’ शंका

‘आपल्याला काही होणार नाही हा आत्मविश्वास मला नडला. करोना पॉझिटिव्ह झाल्याचं समजताच कुटुंबाची चिंता लागली. घरात कुणाला करोनाची लागण झाली नसेल ना, हा विचार सतत यायचा. सर्वात आधी आईचा चेहरा समोर आला. मुलींनी सगळं समजून घेतलं. आता माझी प्रकृती चांगली आहे. सध्या घरातचं क्वारंटाइन आहे. जनतेच्या आशीर्वादानं व आई-वडिलांच्या पुण्याईमुळं मला हे जीवन पुन्हा मिळालं आहे,’ अशी कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘मानसिकदृष्ट्या खचून जाऊ नका. खूप आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.

बीडच्या राजकारणात पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण-भावातील संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या संघर्षाने अगदी टोक गाठले होते. प्रचारात अत्यंत खालची पातळी गाठली गेली होती. परळीच्या लढाईत धनंजय यांनी पंकजांना पराभूत केले होते. राजकारणामुळं संबंधांमध्ये आलेला हा कडवटपणा धनंजय मुंडे यांच्या आजारपणामुळं काही प्रमाणात कमी झाल्याचं मानलं जात आहे.

आणखी वाचा: सुटले म्हणता, म्हणता इंदोरीकर महाराज पुन्हा अडकले!

आणखी वाचा: ‘महार, मराठा, शीख रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का?’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

मास्क न लावणाऱ्यांमुळे वाढू शकतो करोनाचा धोका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गवाढीच्या (उच्चतम बिंदू) महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई आली असल्याचे निरीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केले जात असले तरीही ...

Recent Comments