Home शहरं मुंबई Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार...

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार – kirit somaiya lodged a complaint against dhananjay munde with the election commission and demanded action


मुंबई: बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना भारतीय सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकीकडे मुंडे यांच्यावर निशाणा साधतानाच दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता निवडणूक आयोगाकडे (Election Commission) धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात दोन लग्नांचा उल्लेख केलेला नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. माहिती लपवून ठेवल्याने आयोगाने मुंडे मुंडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागमी सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. (kirit somaiya lodged a complaint against dhananjay munde)

धनंजय मुंडे यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन पत्नींची आणि सर्व मुलांची माहिती लपवली होती. तसेच त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती देखील त्यांनी लपवली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे.

सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, ‘मी या पत्रासोबत महाराष्ट्रातील मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतची काही कागदपत्रे जोडलेली आहेत. त्या कागदपत्रांनुसार, मुंडे यांनी आपण दोनदा लग्न केल्याचं जाहीर केले आहे. आपण दोन्ही पत्नींची आणि मुलांची काळजी घेत असल्याचेही त्यांनी जाहिरपणे म्हटलेले आहे.

क्लिक करा आणि वाचा- धनंजय मुंडे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा; भाजपचा आक्रमक पवित्रा

धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीची बहिण रेणू शर्मा यांनी मुंबई पोलिसांत धनंजय मुंडेंविरोधात बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आरोप फेटाळून लावत असताना त्यांनी फेसबुकवर आपली बाजू मांडली आहे. आपण दोन्ही पत्नींच्या नावे मालमत्ता खरेदी केली आहे. तसेच आपल्या दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलांना आपण आपले नाव दिले असून त्यांचे पालनपोषणही आपणच करत असल्याचे मुंडे यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर रेणू शर्मा आणि आपल्यात जवळचे संबंध असल्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ही त्यांची कौटुंबिक बाब; धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
क्लिक करा आणि वाचा- धनंजय मुंडेंवरील आरोपांवर देवेंद्र फडणवीसांची संयमी भूमिका; म्हणाले…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: farmers protest : शेतकरी आणि सरकारमध्ये आता बुधवारी बैठक; कृषीमंत्री बोलले… – farmers protest farm laws agriculture minister narendra singh tomar

नवी दिल्लीः आंदोलनकारी शेतकरी संघटनांसह ( farmers protest ) सरकारची चर्चेची दहावी फेरी आता बुधवारी २० जानेवारीला होणार आहे. यापूर्वी ही चर्चा १९...

Shane Warne As He Remains Unimpressed With Tim Paine’s Tactics – IND vs AUS : भारतीय संघच बेस्ट, शेन वॉर्नने दिला ऑस्ट्रेलियाच्या संघाला घरचा...

ब्रिस्बेन, IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू शेन वॉर्नने यावेळी आपल्याच संघाला घरचा अहेर दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार टीका करत...

Recent Comments