Home शहरं मुंबई Dhananjay Munde: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण करोना पॉझिटिव्ह - dhananjay...

Dhananjay Munde: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण करोना पॉझिटिव्ह – dhananjay munde tested corona positive


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ५ जणांना करोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह
त्यांचा मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक अशा पाच जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

मुंबईत आल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट काल रात्री आले. यात धनंजय मुंडेंसह पाच जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी कुणामध्येही करोनाची लक्षणं दिसून आली नव्हती.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये करोनाचा संसर्ग झालेले धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते करोनामुक्त झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची बाधा झाली होती. तेही करोनामुक्त झाले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today

मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे....

Ramdas Athawale Corona Positive: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना करोनाची लागण; कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना – Union Minister Ramdas Athawale Tests Covid Positive

मुंबईः अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे....

Recent Comments