Home शहरं मुंबई Dhananjay Munde Corona Positive: धनंजय मुंडे फायटर आहेत, ते लवकरच 'कमबॅक' करतील:...

Dhananjay Munde Corona Positive: धनंजय मुंडे फायटर आहेत, ते लवकरच ‘कमबॅक’ करतील: टोपे – Coronavirus : Dhananjay Munde To Be Admitted In Breach Candy Hospital, Said Rajesh Tope


मुंबई: ‘धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना श्वसनाचा किरकोळ त्रास आहे. बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. तरीही खबरदारी म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार आहोत. मुंडे हे फायटर आहेत. ते लवकर बरे होतील, असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज व्यक्त केला. (Rajesh Tope on Dhananjay Munde)

काकांपाठोपाठ आदित्य ठाकरेंचीही फेसबुक पोस्ट, म्हणाले…

ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद भूषवणारे धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं गुरुवारी रात्री समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यानंतर कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेले मुंडे हे ठाकरे सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील बहुतेक जण क्वारंटाइन झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकारांना मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ‘मुंडे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांना करोनाची कुठलीही लक्षणं नाहीत. त्यांची एसपीओ लेव्हल नॉर्मल आहे. मुंडे हे फायटर आहेत. ते लवकरच बरे होऊन पुन्हा कामाला सुरुवात करतील,’ असं टोपे म्हणाले.

मुंडे हे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली होती. याबाबत टोपे यांना विचारलं असता, ‘मुंडे हे दोन्ही ठिकाणी होते हे खरं आहे. मात्र, वर्धापनदिनाचा कार्यक्रम अवघ्या पाच मिनिटांचा होता. तिथं कुणाचंही भाषण झालं नाही. ध्वजारोहण करण्यासाठीही मोजके पाच लोक होते,’ असं ते म्हणाले.

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही: उद्धव ठाकरे

‘आम्ही जेव्हा-केव्हा एकत्र येतो, तेव्हा सुरक्षित अंतरावर असतो. उपमुख्यमंत्री अजित पवार त्याबाबत खूप कटाक्षानं काळजी घेतात. बैठकीची व्यवस्थाही सुरक्षित अंतर राखलं जाईल अशीच असते. दोन व्यक्तींच्या मध्ये एक खुर्ची रिकामी ठेवली जाते. बैठकीत मास्कही वापरले जातात. त्यामुळं संसर्ग होण्याची अजिबात शक्यता नसते,’ असंही त्यांनी सांगितलं.

वाचा: मी खरंच भाग्यवान आहे; राज ठाकरे झाले भावूकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Construction sector: मुंबई वगळता इतरत्र समान एफएसआय; होणार दुहेरी फायदा – state government has given integrated comprehensive development control regulations to construction except mumbai

मुंबई : राज्य सरकारने मुंबई शहर वगळता राज्यातील अन्य बांधकाम क्षेत्रासाठी 'एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली'ला मूर्त रूप दिले आहे. यानुसार आता महापालिका...

dr. vijayalakshmi ramanan: इतिहासाची पाऊलखूण : डॉ. विजयालक्ष्मी रामनन – tribute to india’s first woman doctor later wing commander of iaf, vijayalakshmi ramanan

वयाच्या ९६व्या वर्षी शांतपणे जगाचा निरोप घेतलेल्या देशाच्या पहिल्या महिला हवाई अधिकारी डॉ. विजयालक्ष्मी रामनन (vijayalakshmi ramanan )यांनी प्रदीर्घ कालखंड अनुभवला.  Source link

degree exam cet clash: सीईटी परीक्षार्थींसाठी ‘आयडॉल’ची स्वतंत्र परीक्षा – final year exam cet clash, idol’s separate test for cet candidates

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सीईटी परीक्षा आणि 'आयडॉल'ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित...

Recent Comments