Home संपादकीय Dhavte Jag News : आवश्यक उपाययोजना - necessary measures

Dhavte Jag News : आवश्यक उपाययोजना – necessary measures


देश चौथ्या लॉकडाउनच्या अंतिम टप्प्यात असताना ठप्प अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या उपाययोजना आवश्यक व स्वागतार्ह आहेत. विविध धोरणांमुळे बँकांचे कर्जदर आणखी कमी होण्यास मदत होईल. विशेषत: गृहकर्जाचे हप्ते गेल्या १५ वर्षांतील निम्नतम पातळीवर जाऊ शकतील. रेपो दरात ४० अंकांची म्हणजे ०.४ टक्के दराची कपात केल्याने कर्जाचे दर कमी होतील आणि रिव्हर्स रेपो दरातही कपात केल्याने कर्जपुरवठ्याच्या क्षमतेत वाढ होईल; कारण बँकांना रिझर्व्ह बँकेकडे पैसे ठेवण्याऐवजी कर्ज देण्यासाठी अतिरिक्त पैसे उपलब्ध होतील; तसेच बँकांना अधिक फायदा होईल. बँकांनी प्राप्त परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रिझर्व्ह बँकांच्या सवलती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला, तर गृहकर्जाचे दर सात टक्क्यांवर येतील. या व्यतिरिक्त कोमात गेलेल्या उद्योग-व्यवसायांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त तीन महिने कर्जफेडीस स्थगितीची मुभा (मोरेटोरियम) दिली आहे. अर्थात, या आधीच्या निर्णयाच्या वेळी स्पष्ट केल्यानुसार शेवटी ग्राहकाला हे मोरेटोरियम महागात पडते. त्यामुळे शक्य असेल, त्यांनी कर्जाचे हफ्ते तीन महिन्यांसाठी पुढे न ढकलता भरणेच इष्ट ठरेल. अर्थात, ज्यांची आमदनीच लॉकडाउन झालेली असेल, त्यांना हा दिलासा आहे. ही स्थगिती; तसेच गृहकर्जावरील व्याजदर कपात याबाबत सर्व बँकांची धोरणे सारखी नाहीत. त्यामुळे, अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी दोन गोष्टी करता येतील. पहिली, पॅकेजऐवजी लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या सर्व उद्योगांसाठी कर्जाच्या पुनर्रचनेची सुविधा देण्याचा विचार व्हावा. त्याचप्रकारे, कर्जे स्वस्त होतील, यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांवर दबाव कायम ठेवत केंद्र सरकारने ग्राहकांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचा विचार करावा. उदाहरणार्थ, गृहखरेदीत मोठी उलाढाल महिन्यांत व्हावी, असे वाटत असेल, तर नोकरदार; तसेच खरेदीदाराला प्राप्तिकरात अतिरिक्त सवलत किंवा अनुदान देण्याविषयी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. गृहकर्जासाठी दिलेल्या प्रोत्साहनपर सवलतींमुळे मध्यम व उच्च मध्यमवर्गाने या क्षेत्राला चालना दिल्याचा इतिहास फार जुना नाही. नागरिक जितका खर्च करतील, तितकीच आर्थिक उलाढाल होईल आणि स्वस्त कर्जे अर्थव्यस्थेतेचे रुतलेले चाक बाहेर येण्यास मदत करू शकतील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Recent Comments