Home संपादकीय Dhavte Jag News : दुर्दैव कायम - the misfortune persisted

Dhavte Jag News : दुर्दैव कायम – the misfortune persisted


दुर्घटना घडल्यानंतर बदल घडवण्याची जितकी चर्चा होते, तितकीच ती परिस्थिती आहे तशीच उरते, असे दुर्दैवाने आसाममधील तेलविहिरीला लागलेल्या आगीच्या संदर्भात उद्विग्नपणे नमूद करावे लागते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदर तेलविहीर बंद करत असताना, सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचा दावा केल्यानंतरही आग लागून या दुर्घटनेत दोघांचे बळी गेले, ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. या आगीमुळे जमीन उद्ध्वस्त होणे, जलसाठे दूषित होणे तर निश्चित आहेच, त्याचबरोबर जीवप्रजातींच्या नष्ट होण्यातून कधीही भरून न येणारी हानी होते. त्या नुकसानाचा अद्याप अंदाज आलेला नाही. दुर्घटना ही दुर्घटनाच असते, असे म्हणून त्याच्याकडे तटस्थपणे पाहणे ही बाब वेगळी; पण या प्रसंगी झालेली हलगर्जी दुर्लक्ष करता येण्याजोगी नाही. सुरक्षा व्यवस्था आणि त्याची नमूद प्रक्रिया पद्धती पाळली न गेल्यामुळे, बागजन गावातील या विहिरीला आग लागली. सर्वाधिक नफा देणाऱ्या तेलउद्योगाकडे आपले कामकाज सक्षमपणे करता येण्याजोगी सुरक्षा प्रणाली उपलब्ध नसावी, पुरेशी सुसज्जताही नसावी, ही अत्यंत दुर्दैवी आणि उद्विग्न करणारी बाब आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आता उच्चस्तरीय चौकशीचे दिले आहेत. अशा चौकशांमधून काय निघते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आतापर्यंत सर्वाधिक तेल देणाऱ्या या पाच नंबरच्या विहिरीच्या तेल उत्पादनात अडथळा निर्माण होत असल्याने, तिची दुरुस्ती करण्याचे हाती घेण्यात आले होते. अत्यंत गुंतागुंतीच्या या कामातून ती बंद करण्याचा निर्णय होऊन, तिला काँक्रिटचे सील लावण्यात आले. तसे करूनही तिच्यातून वायुगळती होण्याचा संभाव्य धोका खरा ठरला. याचा अर्थ ती उपाययोजना कुचकामी ठरली. गेले दोन आठवडे वायुगळती सुरू झाल्याने, सात हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले. आता चौकशी पूर्ण झाल्यावर हा यांत्रिक दोष होता, प्रक्रिया न पाळल्याचा दोष होता, मानवी दोष होता, की या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम होता, हे स्पष्ट होईल; परंतु आधीही अशा दुर्घटना घडूनदेखील अद्याप त्यावर कायमचा इलाज सरकारी उद्योगाला सापडत नसेल, तर काय बोलणार?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raosaheb Danve: प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपये दंड – aurangabad municipality civic chief astik kumar pandey fined 5000 rupees to project director of rural...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददिशा समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांसाठी प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून पुस्तके आणल्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय...

CSK: चेन्नई एक्स्प्रेस नव्हे ही तर मालगाडी; भारतीय क्रिकेटपटूची टीका – aakash chopra says chennai express now became goods train

नवी दिल्ली:IPL 2020 आयपीएलच्या १२ हंगामात सर्वात सातत्यापूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडे (Chennai Super kings) पाहिजे जाते. पण या वर्षी...

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना दुसऱ्यांदा दणका दिला आहे. या पावसामुळे विद्यापीठाने उद्या पासून सुरू...

Recent Comments