Home क्रीडा dhoni trending: महाराष्ट्रात सोशल मीडियावर धोनी ट्रेडिंग; जाणून घ्या कारण! - m...

dhoni trending: महाराष्ट्रात सोशल मीडियावर धोनी ट्रेडिंग; जाणून घ्या कारण! – m s dhoni trending in maharashtra this is the reason


मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिह धोनी अचानक बुधवारी सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आला. खर तर धोनी संदर्भात तशी कोणतीही नवी बातमी सध्या आलेली नाही. असे असताना देखील तो ट्रेडिंगमध्ये आला आहे. जाणून घेऊयात काय आहे कारण….

वाचा- शशांक मनोहर यांनी ICCच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा!

गेल्या काही काळापासून धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. असे असेल तरी तो अनेक वेळा चर्चेत आला आहे. यातील अधिकवेळा चर्चेत येण्याचे कारण धोनीच्या निवृत्तीसंदर्भातील वृत्त होते. धोनीने भारतीय संघाकडून गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये अखेरचा समाना खेळला होता. त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. या वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून तो पुन्हा मैदानावर परतणार होता. पण करोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली.

वाचा- पाकिस्तानचे करायचे तरी काय? करोना काळात केली मोठी चूक!

आता धोनी अचानक ट्रेडिंगमध्ये येण्याचे कारण म्हणजे या महिन्यात सात तारखेला त्याचा वाढदिवस आहे. धोनीच्या चाहत्यांनी त्याला आताच शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे.

वाचा- धोनीने मोठी चूक केली; नाही तर…

सोशल मीडियावर धोनीच्या चाहत्यांनी त्याला सात दिवस आधीपासून शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी धोनीचे फोटो, व्हिडिओ आदी गोष्टी शेअर केल्या आहेत.

वाचा- धोनीला मिळणार खास भेट; असे आहे वाढदिवसाचे गिफ्ट!

धोनीने भारताकडून ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ टी-२० सामने खेळले आहे. त्याने कसोटीत ४ हजार ८७६, वनडेत १० हजार ७७३ आणि टी-२०त १ हजार ६१७ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून धोनीने २०० सामन्यात संघाचे नेतृत्व केले. यातील ११० सामन्यात विजय आणि ७४ मध्ये पराभव झाला. धोनी भारताकडून सर्वाधिक सामन्यात कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणारा खेळाडू आहे.
बांगलादेशविरुद्ध २००४ मध्ये वनडेत पदार्पण करणाऱ्या धोनीने न्यूझीलंडविरुद्ध अखेरची वनडे खेळली होती. या सामन्यात त्याने ५० धावांची खेळी केली होती. पण भारताचा १८ धावांनी पराभव झाला आणि भारताचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न भंगले. धोनीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

हे देखील वाचा-
द अनटोल्ड स्टोरी: सुशांतबद्दल धोनी म्हणाला होता…
भारतीय खेळाडूकडे IPLच्या ऑल टाइम संघाचे नेतृत्व!
धोनीने घडवला इतिहास; क्रिकेटपटूंनी मैदानात केला डान्स!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

L&T Construction Awarded Mega Contract : बुलेट ट्रेन प्रकल्प सुस्साट; ‘लार्सन अँड टुब्रो’ला मिळाले कंत्राट – l&t construction awarded mega contract to build india’s...

मुंबई : 'एल अँड टी'च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले...

…चहावाला निघाला सट्ट्याचा ‘बुकी’

म. टा. प्रतिनिधी, दुबई येथे सुरू असलेल्या '' सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ''ला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सत्यनारायण मुंदडा (४०, रा. सिडको)...

Suryakumar Yadav: IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले… – ipl 2020: indian head coach ravi...

आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...

Recent Comments