Home शहरं धुळे dhule News: अमळनेर करोनाचे ‘हॉटस्पॉट’! - amalner corona's 'hotspot'!

dhule News: अमळनेर करोनाचे ‘हॉटस्पॉट’! – amalner corona’s ‘hotspot’!


अमळनेर करोनाचे ‘हॉटस्पॉट’!

जळगाव जिल्ह्यात पुन्हा चार पॉझिटिव्ह; अमळनेरचे तीन, भुसावळमधील एकाचा समावेश

टीम मटा

खान्देशातील करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, रविवारी (दि. २६) जळगावात चार, धुळ्यात तीन करोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील चारपैकी तीन जण अमळनेरचे असून, एक भुसावळचा आहे. त्यामुळे आता अमळनेरकरांची चिंता वाढली असून, हळूहळू अमळनेर करोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने आता घरपोच अत्यावश्यक वस्तू पोहोचविण्याची योजना कार्यान्वित केली आहे. तसेच शहरात करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांनी दिली आहे. अमळनेकरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून घरातच थांबावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या वाढत्या संसर्गवेगाने तिन्ही जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सद्य:स्थितीत जळगाव १८, धुळे २४ आणि नंदुरबारमध्ये ११ असे एकूण ५३ पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यापैकी केवळ जळगावातील पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. आतापर्यंत खान्देशात करोनाचे एकूण आठ बळी गेले आहेत.

अमळनेरकरांच्या चिंतेत वाढ

जळगाव : जिल्ह्यात करोनाचा संसर्गवेग वाढत असून, रविवारी (दि. २६) पुन्हा चार संशयितांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हची संख्या एकूण १८ झाली असून, जिल्हा रेडझोनमध्ये आला आहे. या चार पॉझिटिव्हपैकी रविवारी पुन्हा अमळनेरचे तीन पॉझिटिव्ह समोर आले आहेत. तर भुसावळच्या एकाचा यात समावेश आहे. करोना संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याचे समोर आले आहे. भुसावळात करोनाने शिरकाव केल्याचे यातून स्पष्ट होत असून, आतापर्यंत दोन करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात करोना संशयित म्हणून दाखल करण्यात व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी चार रुग्णांचे अहवाल रविवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. या चारही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी तीन करोना बाधित रुग्ण हे अमळनेर येथील असून, एक भुसावळ शहरातील आहे. अमळनेरातील तिन्ही रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या करोना बाधितच्या संपर्कातील आहेत. गेल्या आठवडाभरापासून अमळनेर शहरात सातत्याने करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमळनेर शहर हे जिल्ह्यातील कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे. आतापर्यंत अमळनेर शहर तसेच तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या तेरा इतकी आहे. त्यात एक महिला आणि दोन पुरुषांचे मृत्यू झाले, तर दहा जणांवर सद्य:स्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील आकडेवारी

जिल्ह्यात रुग्णांची संख्या …. १८

बरे झालेले रुग्णसंख्या …. ०१

मृत्यू झालेले रुग्ण …. ०४

संसर्ग कक्षात उपचार …. १३

अत्यावश्यक वस्तू घरपोच मिळणार

अमळनेर शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या एकूण संख्या तेरा झाली असून, संख्या वाढत असतानादेखील नागरिक सुरक्षित वावर पाळत नाहीत. आता अमळनेर नगरपरिषद व कृषी विभाग यांच्यामार्फत किराणा व भाजीपाला यांची घरपोच सेवा सुरू केली आहे. तरी सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तू घरपोच मागवाव्यात. या सुविधेत शहरातील सर्व सतरा प्रभागांतील नगरसेवक, दूधविक्रेता, किराणा दुकानदार, अधिकारी, भाजीपाला विक्रेते आणि मेडिकल दुकान यांचे संपर्क क्रमांक देत त्यांनाच अत्यावश्यक वस्तूंची यादी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासगी डॉक्टर्स यांनादेखील प्रशासनाने सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बारागाड्या उत्सव रद्द

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, जळगाव शहरातील मेहरूण आणि पिंप्राळा परिसरातील भवानी मातेचा यात्रोत्सवासह बारागाड्या ओढण्याचे उत्सव रद्द करण्यात आला आहे. पहिल्यांदाच पिंप्राळा येथील बारागाड्यांची परंपरा ७३ तर मेहरूणमधील परंपरा दीडशे वर्षांची परंपरा खंडित झाली असून, भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. अक्षय्यतृतीयेनिमित्त पिंप्राळा येथील बारागाड्यांची परंपरा १९४७ पासून सुरू झाली होती. भगवान भगत यांनी पहिल्यांदा बारागाड्या ओढल्या होत्या. तर मेहरूणमधील बारागाड्यांची परंपरा दीडशे वर्षांपूर्वीची आहे. कै. बहिरम रावजी भगत यांनी ही परंपरा सुरू केली होती. या वेळी केवळ बारागाड्यांचे पूजन केले जाणार आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘करोना’शा लढताना अर्थचिंता

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोना विषाणू संसर्गाशी लढा देताना पायाभूत सुविधा, मनुष्यबळाप्रमाणे निधीचीही गरज आहे, पण गेल्या सात महिन्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि...

Nashik News : ‘ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा’ – caste based obc census should be conducted

म. टा. वृत्तसेवा, कळवणमराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये. त्यामुळे राज्यातील संपूर्ण ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात...

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

Recent Comments