Home शहरं धुळे dhule News : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’ - contract health workers on...

dhule News : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’ – contract health workers on strike


नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असून, शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

करोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एनएचएम कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेत झोकून दिले आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल शासनाची भूमिका उदासीन आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत आंदोलन करण्यात आले आहे. करोनासंकटात माघार न घेता एनएचएम कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अखंडपणे रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. परंतु, करोनाच्या रुग्णावर उपचार करीत असतांना मास्क, ग्लोज, सॅनिटाइजर व आवश्यक ती सुरक्षिततेची साधने उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. परंतु, असे असतानाही त्यासाठी या कर्मचाऱ्यांना काळ्याफिती लावून आंदोलन करावे लागत आहे. त्यावरही या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्याची दखल घेतली जात नाही.

या कर्मचाऱ्यांचा सेवा काळ पंधरा वर्षांपासून अधिक झाला असूनही शासनाने त्यांचे शासकीय सेवेत समायोजन केलेले नाही. त्यांना अद्याप अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. तुलनेने नव्याने झालेल्या कंत्राटी भरतीतील कर्मचाऱ्यांनाही त्यांच्यापेक्षा अधिक मानधन देण्यात येते. परंतु, याच करोना योद्धांची सरकारकडून दखल घेतली जात नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामुळे ११ जूनपासून बेमुदत कामबंद राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीने घेतला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवदेन देण्यात आले. याचबरोबर पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी, खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी यांनाही याची प्रत देण्यात आली आहे. याप्रसंगी एल. जी. माळी, चंद्रकला पावरा, सविता गावित, शंकुंतला ब्राह्मणे (धडगाव), पुष्पा बागूल, सुनंदा वळवी, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते उपस्थित होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL points table: IPL2020: सलग तीन विजयानंतर पंजाबने घेतली गुणतालिकेत मोठी झेप, पाहा काय झाला बदल – ipl2020: kings eleven punjab took 5th position...

दुबई : आज किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएलमधील विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. आजच्या सामन्यात तर दिल्ली कॅपिटल्सला पंजाबच्या संघाने मोठा धक्का दिला. त्यामुळे...

Recent Comments