Home शहरं धुळे dhule News : करोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी जबाबांची नोंद - record of answers...

dhule News : करोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी जबाबांची नोंद – record of answers in the case of the death of a coronated old man


पोलिसांनी मागविली रुग्णालयाकडून कागदपत्रे

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

येथील कोविड रुग्णालयात घडलेले करोनाबाधित ८२ वर्षीय वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक ती कागदपत्रे मागवली आहेत. या प्रकरणाचे तपासाधिकारी पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांनी गुरुवारी रुग्णालयात भेट देऊन वॉर्ड क्रमांक ७ मध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तेथील काही डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आणि वॉर्डलेडी यांचे जबाबदेखील नोंदवून घेतले.

भुसावळ येथील एका ८२ वर्षीय वृद्धेचा मृतदेह वॉर्ड क्रमांक ७ मधील शौचालयात आढळल्याने खळबळ उडाली होती. वृद्धेवर उपचार सुरू असताना या वॉर्डातील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय आणि वॉर्ड लेडी यांनी उपचाराकडे दुर्लक्ष करीत निष्काळजीपणा केल्यानेच वृद्धेचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचे तपासाधिकारी अकबर पटेल यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब नोंदवले. वृद्धा बेपत्ता झाल्यापासून म्हणजेच १ ते १० जूनदरम्यान वॉर्ड क्रमांक ७ मध्ये ड्युटीवर कोण डॉक्टर्स आणि कर्मचारी होते. त्यांचे हजेरी पुस्तकदेखील पोलिस निरीक्षक पटेल यांनी पडताळून पाहिले. त्याचप्रमाणे, हजेरी पुस्तकातील नोंदींची माहिती तपासाच्या अनुषंगाने घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक यांच्याशीदेखील तपासाच्या दृष्टीने चर्चा केली. या प्रकरणात कशा पद्धतीने हलगर्जीपणा झाला आहे, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. प्राथमिक तपासाचा अहवाल पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना सादर केला जाणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: वाईटावर चांगल्याचा विजय; कंगनानं पुन्हा राऊतांना डिवचलं – kangana ranaut attacks on cm uddhav thackeray, sanjay raut

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगानानं पुन्हा एकदा संजय...

Kalyan Kale: ‘देवगिरी’त बागडेंनी आडवे येऊ नये – former mla dr. kalyan kale warns to mla haribhau bagde over devgiri cooperative sugar factory

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री'देवगिरी कारखान्यावर प्रशासकीय मंडळ येणारच. कारखाना सुरू होणार यात शंका नाही. मात्र, या कामात आमदार हरिभाऊ बागडेंनी आडवे येऊ नये,'...

RCB vs CSK: RCB vs CSK IPL 2020: बेंगळुरू विरुद्ध चेन्नई प्रतिष्ठ वाचवण्यासाठी खेळणार – rcb vs csk ipl 2020 match preview update and...

दुबई: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात आज रविवारी डबल हेडरमधील पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore vs Chennai...

Recent Comments