Home शहरं धुळे dhule News : केळी पीकविम्याच्या निकषावरून खासदार व पालकमंत्र्यांमध्ये मतभेद - disagreement...

dhule News : केळी पीकविम्याच्या निकषावरून खासदार व पालकमंत्र्यांमध्ये मतभेद – disagreement between mp and guardian minister on banana crop insurance criteria


केळी पीकविम्याच्या निकषावरून

खासदार व पालकमंत्र्यांमध्ये मतभेद

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

राज्य सरकारने केळी पिकासाठी पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना पूर्वीप्रमाणेच लागू करावी, या मागणीचे निवेदन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, केळी पिकासाठी पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना पूर्वीप्रमाणेच लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती. खासदार व पालकमंत्र्यांच्या या मतभेदांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी दुपारी भाजपचे काही पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन केळी पिकासाठीच्या पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेबाबत निवेदन सादर केले. या योजनेचे निकष पूर्वीप्रमाणेच असावेत, अशी या शिष्टमंडळाची मागणी होती. राज्य सरकारवर निष्क्रिय असल्याची टीका करीत या योजनेचे निकष बदलले तर आंदोलनाचा इशाराही या वेळी रक्षा खडसेंनी देऊन टाकला.

या विषयासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, केळी पिकासाठीच्या पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे निकष पूर्वीप्रमाणेच असणार आहेत. या विषयावर कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्र्यांनी त्यावर अभ्यास करण्यासाठी उपसमितीदेखील नेमली आहे. हा विषय मार्गी लागला आहे. पण, खासदार रक्षा खडसेंना कदाचित हे माहिती नसावे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाला अर्थच नाही, असा चिमटाही गुलाबराव पाटील यांनी काढला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

coronavirus updates: Coronavirus मास्क न घातल्यास दोन वर्ष तुरुंगवास; ‘या’ देशाने लागू केला कायदा – people who refuse to wear covid masks will be...

अदीस अबाबा: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. काही देशांमध्ये नियंत्रणाची परिस्थिती निर्माण झाली असताना करोनाची दुसरी लाटदेखील आहे. करोनामुळे श्रीमंत आणि विकसित...

Recent Comments