Home शहरं धुळे dhule News : चाळीसगाव येथील डॉक्टर नाशिकला पॉझिटिव्ह - the doctor from...

dhule News : चाळीसगाव येथील डॉक्टर नाशिकला पॉझिटिव्ह – the doctor from chalisgaon tested positive for nashik


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

शहरातील खासगी डॉक्टर नाशिकला पॉझिटिव्ह आढळून आला आहे. शहरातील जहागीरदारवाडी भागात या डॉक्टरचा दवाखाना असून, त्यांच्या संपर्कातील चार जणांना क्वारंटाइन करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी देवराम लांडे यांनी दिली.

मूळचा कन्नड तालुक्यातील ५५ वर्षीय असलेल्या या डॉक्टरचा जहागीरदारवाडी भागात दवाखाना आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी ते येथील दवाखाना बंद करून नाशिकला गेले होते. तेथे गेल्यावर त्यांचर प्रकृती बिघडल्याने त्यांनी तपासणी करण्यात आली. त्यात ते गुरुवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. तालुका प्रशासनाने याची माहिती मिळताच प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी जहागीरदारवाडी परिसरात धाव घेऊन पाहणी केली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या चार जणांना क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे माहिती डॉ. लांडे यांनी दिली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही परिसरात जंतूनाशकाची फवारणी करून परिसर सॅनिटाइझ केला. संबंधित डॉक्टर काही दिवसांपूर्वी कन्नड तालुक्यातील आपल्या मूळगावी गेला होता. तेथे त्यांना करोनाची लागण झाली असावी असा अंदाज आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus Second Wave: Coronavirus updates करोनाची दुसरी लाट; युरोपमध्ये सात दिवसात सव्वानऊ लाख बाधित – coronavirus second wave numbers of infected people rising in...

जिनिव्हा : युरोपात आठवडाभरात ९ लाख २७ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले असून, युरोपातील आठवड्याच्या रुग्णसंख्येने गेल्या आठवड्यात उच्चांक गाठला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने...

entrepreneur: ..तर लहान उद्योग कसे जगतील? – entrepreneur purchase plot from midc in cheap rate and sale by that plot cut in many pieces...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक भूखंड घोटाळ्याचे लोण सातपूर औद्योगिक वसाहतीतही असून, मोठा उद्योग सुरू करण्यासाठी ७५ पैशांनी घेतलेले मोठे प्लॉट आज छोटे छोटे...

upsc capf interview: यूपीएससी सीएपीएफ भरती: मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर – upsc capf 2019-20 interview dates are released by upsc

UPSC CAPF 2019-20 interview: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) CAPF 2019-20 साठी मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत....

Recent Comments