Home शहरं धुळे dhule News : चोरलेली पँट घालताच चोरटा सापडला - the thief was...

dhule News : चोरलेली पँट घालताच चोरटा सापडला – the thief was found wearing stolen pants


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

सेंट्रल फुलेमार्केट मध्येसोनी रेडिमेड मेन्स वेअर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी रेडिमेड कपडे चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान, चोरट्याने याच दिवशी सायंकाळी चोरलेली जीन्स पॅण्ट घालताच खबऱ्याने पोलिसांनी माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याला जेरबंद केले. पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सेंट्रल फुले मार्केट मध्ये (दुकान नं. ९८) सोनी मेन्स्‌ वेअर हे सनी राजकुमार मतानी यांच्या मालकीचे दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने गेल्या २३ मार्चपासून संपूर्ण मार्केट बंद आहे. मंगळवारी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून आतील २०० पॅन्ट, १९९ टी-शर्ट असा एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला होता. पोलिसांनी दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज मिळवून चोरट्यांचा शोध सुरू केला होता.

चोरी केल्यानंतर संशयित चोरटा दीपक शिवाजी कुंजे याने बुधवारी सायंकाळी चोरीची नवीन जीन्स घातली. त्याने पॅण्टचे लेबलदेखील काढले नव्हते. ही माहिती एका खबऱ्याने शहर पोलिस कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर पोलिसांच्या पथकाने कुंजे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच गुन्ह्यात आकाश जगताप, अनिल सानवणे व रिक्षावाला यांचा सहभाग असल्याची माहिती कुंजे याने दिली आहे. पोलिस इतर संशयितांचा शोध घेत असून, कुंजे याच्या घरातून चोरीच्या जीन्सपॅण्ट, टी-शर्ट मिळून आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

trp scam case: टीआरपी घोटाळा : ‘रिपब्लिक’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स – trp scam case : crime branch special squad summons to five republic tv...

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक टीव्हीच्या पाच गुंतवणूकदारांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी...

Recent Comments