Home शहरं धुळे dhule News : जळगावचे आमदार, महापौरांसह २२ जणांवर गुन्हा - crime against...

dhule News : जळगावचे आमदार, महापौरांसह २२ जणांवर गुन्हा – crime against 22 persons including mla and mayor of jalgaon


विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी कारवाई

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

येथील कोविड रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धेचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात पडून होता. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करताना जमावबंदी तसेच साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याने जळगाव शहराचे भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्यासह २२ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथील एका ८२ वर्षीय करोनाबाधित बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आठवडाभरानंतर बुधवारी कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधील स्वच्छतागृहात आढळून आला होता. त्यानंतर भाजप आमदार सुरेश भोळे व महापौर भारती सोनवणे यांच्या नेतृत्त्वात भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिले होते. त्यानंतर या सर्वांनी रुग्णालयातच आंदोलन केले होते. या वेळी सर्वांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर विना परवानगी गर्दी व आंदोलन करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार भटू नेरकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. यामध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शूचिता हाडा, मनपातील भाजप गटनेते भगत बालाणी, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, पितांबर भावसार व इतर ८ ते १० जणांचा समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Supreme Court: स्थगिती आदेशाचा चुकीचा अन्वयार्थ – advocates have drawn the attention of the state government and the chief justice over interim stay order

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'कनिष्ठ न्यायालये किंवा उच्च न्यायालयांतील दिवाणी किंवा फौजदारी खटल्यांच्या सुनावणीत देण्यात आलेले अंतरिम स्थगिती आदेश हे कमाल सहा महिन्यांपर्यंतच...

Nashik News : २८ टक्के अहवाल पॉझिटिव्ह, तर ७२ टक्के निगेटिव्ह – nashik corona update : nashik corona recovery rate is 91.66 percent

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी हाच योग्य पर्याय ठरत असून, आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल सव्वातीन लाखांहून अधिक...

Ashok Chavan taunts Narayan Rane: नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर अशोक चव्हाणांची टोलेबाजी – pwd minister ashok chavan taunts bjp mp narayan rane

औरंगाबाद: 'नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर मी अधिका भाष्य करणार नाही. खरंतर त्यांच्या टीकेवर कोणी प्रतिक्रिया देखील दिलेली नाही....

Recent Comments