Home शहरं धुळे dhule News : जळगाव जिल्ह्यात वाढलेएका दिवसात २१ रुग्ण - 21 patients...

dhule News : जळगाव जिल्ह्यात वाढलेएका दिवसात २१ रुग्ण – 21 patients in one day in jalgaon district


म. टा. प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या ३० करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यापैकी सोळा व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून, चौदा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, सकाळी आलेल्या ९८ करोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवालांपैकी सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित ९१ निगेटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरात जळगाव जिल्ह्यात २१ रुग्णांची वाढ होऊन २५७ रुग्ण झाले. शनिवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगावातील ७, भुसावळ येथील १२, भडगाव येथील एक व खामगाव (जि. बुलडाणा) येथील एकाचा समावेश आहे. धुळ्यात दोन वाढलेधुळे : शहरातील मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा १२ मे रोजी रुग्णलयात मृत्यू झाला. त्याचा करोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. यामुळे त्याच्या संपर्कात कारागृहातील अधिकारी, डॉक्टर, तुरुंग कर्मचारी आणि तीन कैदी अशा एकूण १२ जणांना क्वारंटाइन केले आहे. जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या ६६ असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, २४ जण करोनामुक्त झाले. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत २१ करोना रुग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला, पंधरा रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bmc health officers: रात्रभर जागले पालिकेचे अधिकारी – bmc officers was facing stress due to not receiving the cowin app’s message regarding covid-19 vaccination...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न...

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

Recent Comments