Home शहरं धुळे dhule News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांची बदली...

dhule News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांची बदली – the dean of jalgaon government medical college, dr. khaire replaced


कोल्हापूरच्या डॉ. गजभिये यांची नियुक्ती

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग रोखण्यातील अपयश, जिल्हा शल्य चिकित्सकांशी असमन्वय या कारणामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. मिनाक्षी गजभिये यांची त्यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गजभिये या जळगाव कॉलेजचा कायमस्वरुपी अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारतील.

राज्याचे `कोविड-१९`चे नोडल अधिकारी तथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी जारी केले. यासह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी नगरच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात करोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. हा उद्रेक रोखण्यात आलेल्या अपयशाचा ठपका खैरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेचे प्रमुख म्हणून शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यातील असमन्वय या कारणांमुळे खैरे यांची बदली करण्यात आली आहे. महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शनिवारपर्यंत पदभार सोपविण्याचे तसेच नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेशात म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

lucknow crime news: ‘तो’ मुलींसोबत करायचा अश्लील चॅटिंग; शेकडो मुलींकडून उकळले पैसे – uttar Pradesh Lucknow Police Arrested Man Who Chatting And Blackmail Girls...

हायलाइट्स:महिलांना ब्लॅकमेल करणारा तरूण अटकेतसोशल नेटवर्किंग साइटवर मुलींसोबत मारायचा अश्लील गप्पाचॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचालखनऊ पोलिसांच्या सायबर सेलने ठोकल्या बेड्यालखनऊ: सोशल...

revenue of cidco: सिडकोच्या भूखंडांना विक्रमी दर – cidco get 92 crore rupees revenue from residential and commercial plot

म. टा. वृत्तसेवा, पनवेलसिडकोने विक्रीसाठी काढलेल्या खारघरमधील निवासी आणि व्यावसायिक भूखंडांना चांगला दर मिळाला आहे. खारघर येथील निवासी तथा वाणिज्यिक भूखंडांच्या विक्रीतून ९२...

raj thackeray: राज ठाकरेंवरील वॉरंट रद्द; पण ‘या’ कारणासाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश – vashi court orders raj thackeray to appear in court

हायलाइट्स:मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेशराज ठाकरेंवरील वॉरंट रद्द करण्यात आला आहे२०१४मधील टोल नाका प्रकरण नवी मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments