Home शहरं धुळे dhule News : बालिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेप - life imprisonment for the...

dhule News : बालिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेप – life imprisonment for the murderer of a girl child


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानतंर विहिरीत फेकून देत तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे. विशेष म्हणजे या खटल्यात काही साक्षीदार फितूर झाल्यामुळे त्यांचे जबाब घेणाऱ्या न्यायाधिशांना साक्षीदार करण्यात आले होते.

आरोपी समाधान लोटन बडगुजर (वय ३४, रा.पिंपळकोठा, ता.एरंडोल) एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाचा मित्र आहे. या मित्राच्या विधवा बहिणीच्या आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन त्याने अत्याचार व खून केला होता. समाधानच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments