Home शहरं धुळे dhule News : महा रक्तदान शिबिरात ३७० बाटल्यांचे संकलन - collection of...

dhule News : महा रक्तदान शिबिरात ३७० बाटल्यांचे संकलन – collection of 370 bottles at maha blood donation camp


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

रक्ताचा साठा शासकीय रुग्णालयात व रक्तपेढ्यांमध्ये अल्प असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, गुलाबराव देवकर फाउंडेशन व मजूर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘महा रक्तदान’ व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे ३७० रक्क बाटल्यांचे संकलन झाले.

याप्रसंगी वर्धापनदिनानिमित्त जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ध्वजारोहण करण्यात आले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते रक्तदान कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

रक्तदान शिबीराला जळगाव शहरातील व जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी व सहकार्यांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला. दिवसभरात ३७० बाटल्यांचे संकलन झाले व ७४८ लोकांनी मोफत रक्तगट तपासणी केली. या महा शिबीराच्या निमित्ताने गुलाबराव देवकर फाउंडेशनतर्फे ५ हजार रक्तदात्यांची यादी तयार करण्याचा संकल्प गुलाबराव देवकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला. राष्ट्रवादी सेवादलाचे वाय. जी. महाजन यांनी सूत्रसंचलन केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

festive sales: ऑनलाइन फेस्टिव सेलमध्ये बनला नवा रेकॉर्ड, प्रत्येक मिनिटाला १.५ कोटींच्या फोनची विक्री – phones worth rs 1.5 crore sold every minute during...

नवी दिल्लीः देशात फेस्टिव सेल दरम्यात ७ दिवस (१५ ते २१ ऑक्टोबर) या दरम्यान पुन्हा एकदा स्मार्टफोन्सने बाजी मारली आहे. शॉपिंग कॅटेगरीत सर्वात...

Nashik farmers: शेतकऱ्यांनो, तक्रार करायला घाबरू नका! – chandrakant khandvi take charge additional superintendent of police

म. टा. वृत्तसेवा, सटाणातालुक्यासह जिल्हाभरात बऱ्याच शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत आहे. परंतु शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. असा कुठलाही प्रकार ज्या कोणी...

ST Corporation: एसटी महामंडळास चार कोटींचा फटका – this year st corporation has lost 4 crore rupees income due to corona crisis and lockdown

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादलॉकडाऊननंतर एसटी बस सेवेला ऑगस्ट महिन्यात सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एसटीला पाच कोटी सहा लाख ९२...

Recent Comments