Home शहरं धुळे dhule News : विद्यापीठासह महाविद्यालये १७ मेपर्यंत बंदच राहणार - colleges including...

dhule News : विद्यापीठासह महाविद्यालये १७ मेपर्यंत बंदच राहणार – colleges including universities will remain closed till may 17


विद्यापीठासह महाविद्यालये

१७ मेपर्यंत बंदच राहणार

म. टा. प्रतिनिधी,जळगाव

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था बंदचा कालावधी येत्या १७ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या काळात सर्व शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी घरी बसूनच आवश्यक असेल ती कार्यालयीन कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार यांनी रविवार दि. ३ मे रोजी परिपत्रक काढले असून, त्यामध्ये १७ मेपर्यंत शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरी राहून काम करावे असे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी ३ मेपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश होते. परंतु, भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच प्राप्त झालेल्या आदेशानुसार करोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी विद्यापीठातील प्रशासकीय विभाग / प्रशाळा / वसतिगृहे तसेच अमळनेर, धुळे व नंदुरबार येथील उपकेंद्र १७ मेपर्यंत बंद राहतील. तसेच संलग्नित महाविद्यालयेदेखील या काळात बंद राहतील. या बंदच्या काळात घरी राहून संबंधित विभागाचे कामकाज करावे. आवश्यकता वाटल्यास वरिष्ठांच्या आदेशान्वये गरजेनुसार कार्यालयात उपस्थिती बंधनकारक राहील, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

water of sewage treatment plant: ‘एसटीपी’चे पाणी होणार आणखी शुद्ध – water of sewage treatment plant will be further purified by aurangabad municipal corporation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेकडून येत्या काळात सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे (एसटीपी) पाणी अधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार...

konkan vidarbha gramin bank: बँक लुटण्यासाठी अर्ध्या रात्री खिडकीतून आत घुसले, अचानक सायरन वाजला अन्… – robber tried to rob vidarbha konkan gramin bank...

हायलाइट्स:विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्नभंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील घटनासंपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदभंडारा: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला....

Batla House encounter: बाटला हाऊस एन्काऊन्टर : १३ वर्षानंतर निर्णय, आरोपी आरिज खान दोषी सिद्ध – delhi court held guilty and convicted ariz khan...

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या बाटला हाऊस एन्काऊन्टर प्रकरणात आज दिल्ली न्यायालयानं आरिज खान याला दोषी करार दिलंय. आरिज खान याची शिक्षा १५...

Recent Comments