Home शहरं धुळे dhule News : विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी - get a candidature for the...

dhule News : विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी – get a candidature for the legislative council


विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी

भाजपनेते एकनाथ खडसेंची पक्षाकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या नऊ विधानपरिषदेच्या जागांसाठी राज्यपालांनी हिरवा कंदिल दिल्याने आता सर्वांचीच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील आपल्याला विधानपरिषदेची संधी द्यावी, अशी इच्छा रविवारी पत्रकारांशी बोलताना बोलून दाखविली. यानंतर पक्ष आपल्या या मागणीचा विचार नक्क करेल, असा आशावादही खडसेंनी बोलताना व्यक्त केला. ते जळगावच्या निवासस्थानी बोलत होते.

विधानपरिषदेच्या निवडणुकीला अनुमती मिळाल्यानंतर करोनामुळे थंड झालेले राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय पुनर्वसनाची इच्छा बोलून दाखवली आहे. ‘मला राज्याच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्ष त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे’, असे खुद्द खडसेंनी रविवारी बोलून दाखविले. खडसे रविवारी दुपारी जळगावात आले होते. त्यावेळी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सर्वस्वी अधिकार राज्यपालांनाच

खडसे म्हणाले की, गेल्या कालखंडात माझ्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा होती. यामध्ये भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने तशी शिफारसदेखील केली. मात्र, मी राज्यसभेसाठी इच्छुक नव्हतो. मात्र, मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस असल्याने मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी मी पक्षाकडे केली आहे. पक्ष त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासदेखील खडसेंनी या वेळी व्यक्त केला. या वेळी त्यांनी पत्रकारांसोबत आपल्या खास शैलीत चर्चा केली. राज्यातील सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीच्या राजकारणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद असून, राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची निवड करावी, कधी करावी तसेच किती काळासाठी करावी, याचे सर्वस्वी अधिकार हे राज्यपालांनाच आहेत. यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला आहे, तो मान्य करून चालावे लागणार आहे, असेही खडसेंनी सांगितले. पक्षावरील आरोप त्यांनी खोडून लावले.

‘अधिक खबरदारी हाच उपाय’

जळगाव जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सद्य:स्थितीत करोनाचे जिल्ह्यात ४५ रुग्ण असून, त्यातील बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची टक्केवारी जास्त असल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे खडसे म्हणाले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे करोनाचा संसर्ग वाढत असून या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांनी सुरक्षित वावरच्या नियमाचे पालन करावे, मास्क बांधावे, गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, राज्य शासन आणि प्रशासनाला करोनाच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन खडसेंनी या वेळी जिल्हावासीयांना केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Audio clip of Shiv Sena’s BMC corporator: पालिकेत सेना-भाजप संघर्ष – bjp corporators agitation against shivsena over audio clip of shiv sena’s bmc corporator...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागत असून, मुंबई पालिकेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत...

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

Recent Comments