Home शहरं पुणे diabetes patients: पॉझिटिव्ह न्यूज! पुण्यात गर्भवती; मधुमेही रुग्णही करोनामुक्त - diabetes patients...

diabetes patients: पॉझिटिव्ह न्यूज! पुण्यात गर्भवती; मधुमेही रुग्णही करोनामुक्त – diabetes patients and pregnant women are cure covid 19 free in pune


पुणे: ससून रुग्णालयात उशिरा उपचारासाठी गेलेल्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर येत असली तरी प्रत्यक्षात गेल्या ७२ दिवसांत एकूण रुग्णांपैकी २७० रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये गर्भवती, मधुमेही, हृदयविकार तसेच अन्य आजार असलेल्या तरुणांपासून ते ज्येष्ठापर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे.

करोना संसर्गाचा पुण्यात ९ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्या रुग्णानंतर संसर्ग अधिक वाढत गेला. सुरुवातीला करोनाचे नायडू रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यात येत होते. ससून रुग्णालयात गंभीर प्रकृतीचे उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार जुन्या इमारतीतील अतिदक्षता विभागात (आयसीयू) गंभीर रुग्णांना दाखल करण्यास सुरुवात झाली. तसेच सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांच्या तपासणीसाठी फ्लू क्लिनिक सुरु करण्यात आले. त्या फ्लू क्लिनिकमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. एप्रिल महिन्यात लागण झालेल्या आणि उपचारासाठी असलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांचा मृत्यू अधिक होत असल्याने चिंता वाढली होती. त्यामुळे ससून रुग्णालयाची प्रतिमा मलिन होण्यास सुरुवात झाली. त्याचे पडसाद म्हणून डॉ. चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. परंतु, ससून रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबले नाही. सातत्याने रुग्णालयात मृत्यू होत असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली. आता रुग्णालयात मृत्यू होत असले तरी दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

‘ते’ ९ तास… करोनाचं क्रौर्य पाहून औरंगाबादकर हादरले!

करोना मृत्यू थांबेना! राज्यात आज १५२ बाधित दगावले; मुंबईत सर्वाधिक ९७ बळीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant Is Recover From Injury And He Will Be Play In Todays Match Against Kings Eleven Punjab – IPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा...

दुबई : पंजाबबरोबरचा सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या संघात एका धडाकेबाज खेळाडूचे आज पुनरागमन होऊ शकते,...

Farmers agitation: जिल्हाधिकारी कार्यालयात उधळला भाजीपाला – aurangabad farmers agitation for announce wet drought and compensation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसातत्याने होत असलेली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील उभे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई तातडीने द्यावी; तसेच जिल्ह्यात ओला...

Recent Comments