Home महाराष्ट्र district officer in kolhapur: तुम्ही आमचे नोकर; शेतीच्या वादावरून जिल्ह्याधिकाऱ्यांसमोर गोंधळ -...

district officer in kolhapur: तुम्ही आमचे नोकर; शेतीच्या वादावरून जिल्ह्याधिकाऱ्यांसमोर गोंधळ – man abused district officer in kolhapur


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘माझे काम आत्ताच्या आत्ता झाले पाहिजे. तुम्ही आमचे नोकर आहात. तुम्ही आमच्यासाठी कामाला बसला आहात,’असे म्हणत थेट जिल्हाधिका-यांच्या दालनात एका व्यक्तीने गोंधळ घातला. यानंतर दालनाबाहेर काढणा-या पोलिसासही त्याने धक्काबुक्की केली. हा प्रकार सोमवारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या दालनात घडला. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी सुजित बाळासाहेब निंबाळकर (वय ४६, रा. सानेगुरुजी वसाहत) याच्यावर गुन्हा दाखल केला.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित निंबाळकर याचा त्याच्या नातेवाईकांसोबत वडिलोपार्जित शेतीचा वाद आहे. याबाबत दिवाणी कोर्टात खटला सुरू आहे. वादावर तोडगा निघावा यासाठी निंबाळकर याने जिल्हाधिका-यांकडे धाव घेतली होती. सोमवारी दुपारी तो जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या दालनात गेला. वाद निकाली निघावा यासाठी संबंधित प्रांताधिका-यांना सूचना दिल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. मात्र, यावर समाधान न झाल्याने निंबाळकरने दालनात जमिनीवरच ठाण मांडले. तुम्ही आमचे नोकर आहात. माझे काम झाल्याशिवाय बाहेर जाणारच नाही, असा पवित्रा त्याने घेतला.

जिल्हाधिका-यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बोलवले. यानंतर निंबाळकरने पोलिस कॉन्स्टेबलसोबत हुज्जत घालून धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्याला ताब्यात घेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अमोल जयसिंग चव्हाण (वय ३४, रा. शिगाव, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments