Home शहरं पुणे doctor comes to patients home: आता डॉक्टरच खुद्द रुग्णांच्या घरी जाणार! -...

doctor comes to patients home: आता डॉक्टरच खुद्द रुग्णांच्या घरी जाणार! – during covid 19 doctor comes to patients door


Mustafa.Attar@timesgroup.com
@mustafaattarMT

पुणे : करोनाच्या काळात कोणतेही दुखणे आल्यास रुग्णालयात जाण्याची आता रुग्णांना भीती वाटू लागली आहे. अशा परिस्थिती अंगावर दुखणे न काढता घरच्या घरीच उपचार मिळण्याची संधी रुग्णांना मिळणार असून आता डॉक्टरच खुद्द रुग्णांच्या घरी जाणार आहेत. ईसीजी, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब आणि साखरदेखील तपासली जाणार आहे. त्यामुळे ‘माझा डॉक्टर, माझ्या दारी’ ही नवी संकल्पना अस्तित्वात येऊ लागली. त्याचा ज्येष्ठांसह रुग्णांना विशेष फायदा होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला रुग्णालयात न बोलाविता त्यांना थेट अनेकदा ‘ऑनलाइन कन्सल्टिंग’ करतात. पण त्यात निदान करण्याचे समाधान डॉक्टरांना होत नाही. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनीच घरी पोहोचण्याची कल्पना पुढे येत आहे.

‘सध्या सर्दी, ताप, खोकल्यापासून ते मधुमेह, हृदयविकार, रक्तदाबाच्या आजारांपर्यंतच्या अनेक रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, करोनाचा फैलाव असल्याने उपचारासाठी रुग्णालयात जाणे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. रुग्णालयात जाण्याची रुग्णांना भीती वाटते. त्या वेळी संसर्ग होण्याचा धोका त्यांना जाणवतो. त्यामुळे अनेकदा करोनाच्या काळात नागरिक विशेषतः ज्येष्ठ व्यक्ती घराबाहेर पडणे टाळतात. त्यांच्यासाठी पूर्वीच्या ‘फॅमिली डॉक्टर’च्या संकल्पनेवर आधारित ‘माझा डॉक्टर, माझ्या दारी’ ही संकल्पना आम्ही राबवित असून त्यामुळे रुग्णांनी संपर्क साधल्यास आता थेट त्यांच्या घरीच डॉक्टर जाऊन उपचार करणार आहेत. रुग्णांना घरातच वेळेवर उपचार मिळतील,’ अशी माहिती अलोहा क्लिनिक्सचे संचालक आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतूपर्ण शिंदे यांनी ‘मटा’ला दिली.

‘सध्या ‘ओपीडी’ला येणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या सेवेचा विस्तार करीत आहोत. रुग्णांनी संपर्क साधल्यास आमचे डॉक्टर रुग्णाच्या घरी जातील. सोबत ईसीजी मशिन, रक्त, शुगर तपासणी, ऑक्सिजन पातळी यासारख्या सुविधा दिल्या जातील. फिजिशियन, मधुमेह तज्ज्ञ किंवा हृदयरोग तज्ज्ञदेखील गरजेनुसार रुग्णांच्या घरी जाऊ शकतील. ‘माझा डॉक्टर, माझ्या दारी’ या संकल्पनेमुळे ज्येष्ठांसह हृदयरोगी अथवा मधुमेहींना रुग्णालयात जास्त वेळ ‘वेटिंग’वर थांबावे लागणार नाही. आमचे डॉक्टर पीपीई किट घालून घरी पोहोचतील. त्यामुळे रुग्णांना संसर्ग होण्याची भीती नाही, ‘ असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

रक्ताच्या चाचण्यांची गरज पडल्यास त्यादेखील घेतल्या जातील. त्यांचे अहवाल संध्याकाळपर्यंत रुग्णांना व्हॉट्स अॅपवर पोहोचविले जातील. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रुग्णांना शारीरिक बदल किंवा अन्य काही शंका वाटल्यास तेथूनच आमचे डॉक्टर वरिष्ठ डॉक्टरांना संपर्क साधतील. त्यामुळे त्या रुग्णांना जागेवर ‘प्रिस्क्रिप्शन’ देण्यात येईल. त्याचा रुग्णांना फायदा होईल.- डॉ. ऋतूपर्ण शिंदे, संचालक व हृदयरोग तज्ज्ञ, अलोहा क्लिनिक

‘होम आयसोलेशन’च्या रुग्णांवर लक्ष केंद्रीत

करोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) हेल्पलाइन तयार केली आहे. सध्या पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी ‘होम आयसोलेशन’चा निर्णय़ सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे ‘आयएमए’ने ‘होम आयसोलेशन’च्या रुग्णांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ‘आयएमए’चे सदस्य असणारे ३० ते ४० डॉक्टर या रुग्णांशी थेट बोलणार असून त्यांच्यावर फोनवरून मोफत औषधोपचार करणार आहेत. रुग्णांनी काय काळजी घ्यावी अथवा स्वतःचे ऑक्सिजन कसे मोजावे, तापमान मोजावे यासाठी सल्ला मार्गदर्शन करणार आहेत. त्याकरिता महापालिकेने आम्हाला मान्यता दिली आहे. अधिक माहितीसाठी रुग्णांनी डॉ. आरती निमकर (९८२२०३०४८२), डॉ. संजय पाटील (९८२२५२०२५७) आणि डॉ. पद्मा अय्यर (९३७३३०५१५४) या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती ‘आयएमए’चे माजी अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

covid 19 vaccine: करोना लसः रजिस्ट्रेशन करताना ‘या’ चुका करू नका – covid 19 vaccine online 5 things to be careful about while registering

हायलाइट्स:करोना लस देशात उपलब्ध असून ती अनेकांनी घेतली आहे लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे या लस संबंधी कोणीही काहीही मागितले तर त्यावर...

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Religious Freedom Act: Love Jihad : मध्य प्रदेश विधानसभेत ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर – mp religious freedom act aims to penalize love jihad...

हायलाइट्स:याआधी, धर्मस्वातंत्र्य अध्यादेशाला राज्यपालांनी दिली होती मंजुरी'लव्ह जिहाद' विरोधात कडक शिक्षेची तरतूद१-१० वर्षांची कैद आणि १ लाखांपर्यंतच्या आर्थिक दंडाची तरतूदभोपाळ : मध्य प्रदेशात...

Recent Comments