Home शहरं मुंबई DOCTORS DAY: Doctor's Day : ... म्हणून आज राज्यात 'डॉक्टर्स डे'चं सेलिब्रेशन...

DOCTORS DAY: Doctor’s Day : … म्हणून आज राज्यात ‘डॉक्टर्स डे’चं सेलिब्रेशन नाही! – maharashtra ima is not celebrating doctors day today


मुंबई:डॉक्टर्स डे निमित्त करोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांना सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात असल्या तरी डॉक्टरांनी मात्र आज डॉक्टर्स डे साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाशी लढताना आतापर्यंत १८ डॉक्टरांचा मृत्यू झाला असून १५०० डॉक्टरांना करोना झाल्याने त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे डॉक्टर आज डॉक्टर्स डे साजरा करताना दिसत नाहीत.

महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने हा निर्णय घेतल्याने आज कोणत्याच रुग्णालयात डॉक्टर्स डे साजरा करण्यात आलेला नाही. केवळ सर्वसामान्यांवरच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रावरही करोनाचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक आरोग्य कर्मचारी करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे आज आम्ही डॉक्टर्स डे साजरा करत नाही. केवळ रुग्णांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं मनोबल वाढवण्यासाठी आत्मसन्मान दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.

करोना काळात डॉक्टरांना ड्युटीवर जाण्यापासून ते सोसायटीमध्ये राहण्यापर्यंत संघर्ष करावा लागला आहे. आमच्या आवाहनानंतर करोनाच्या काळात काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देण्यात आलं आहे. करोना रुग्णांवर उपचार करताना करोनाने दगावलेल्या डॉक्टरांना १५ ऑगस्ट रोजी मेडल देऊन सरकारने सन्मानित करायला हवं, अशी मागणीही भोंडवे यांनी केली.

ऐतिहासिक! ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव रद्द; यंदा फक्त आरोग्यउत्सव

अनेक डॉक्टर करोनाने दगावले. ही घटना अत्यंत दुखद आहे. एक डॉक्टर दगावला तर अनेक रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे केवळ कुटुंबासाठीच डॉक्टर महत्त्वाचे नाहीत तर देशासाठीही ते तितकेच महत्त्वाचे आहेत, असं महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उतूरे यांनी सांगितलं.

पुणे हादरले; भररस्त्यात सपासप वार करून रिक्षाचालकाची हत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bike taxi service in mumbai: बाइक टॅक्सी सुरू – rapido company has decided to start bike taxi service in mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईच्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंबईकरांना नवीन प्रवासी वाहतूक सेवेचा पर्याय शुक्रवारपासून खुला झाला आहे. मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय...

Recent Comments