Home विदेश doctors death in china: करोनाची माहिती देणाऱ्या आणखी एका डॉक्टरचा मृत्यू -...

doctors death in china: करोनाची माहिती देणाऱ्या आणखी एका डॉक्टरचा मृत्यू – coronavirus in china wuhan doctor skin turned dark coronavirus treatment dies


बीजिंग: चीनमध्ये करोना विषाणू संसर्गाची माहिती देणाऱ्या डॉक्टरांच्या पथकात सहभागी असणाऱ्या डॉ. हू वीफेन्ग यांचा करोनाच्या संसर्गाने मृ्त्यू झाला आहे. डॉक्टर हू वीफेन्ग हे चीनच्या वुहान येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये युरोलॉजिस्ट म्हणून ते काम करत होते. करोनाच्या संसर्गाबाबत पहिल्यांदा माहिती देणाऱ्या व्हिसलब्लोअर डॉक्टर ली वेनलियान्ग यांच्या टीममध्ये हू यांचा समावेश होता.

मागील चार महिन्यांपासून हू वीफेन्ग यांची करोनाच्या संसर्गासोबत झुंज सुरू होती. मागील काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्यांचा व्हेंटिलेटर हटवण्यात आला होता. करोनामुळे मृत्यू झालेले डॉक्टर हू वीफेन्ग हे या रुग्णालयातील सहावे डॉक्टर आहेत. हू विफेन्ग यांच्यावर एक महिन्याहून अधिक काळ आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. करोनाची बाधा झाल्यानंतर इतर आजारांनीही उचल खाल्ली. हू विफेन्ग यांच्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान औषधांचे साईड इफेक्ट्स होऊन त्यांच्या त्वचेचा रंग काळा पडला होता. त्यांचे सहकारी कार्डियोलॉजिस्ट यी कॅन यांनाही करोनाची बाधा झाली. औषधोपचारामुळे त्यांच्या चेहऱ्याचा रंग काळा पडला होता. मात्र, यी कॅन यांनी करोनावर मात केली.

वाचा: चीन नव्हे तर ‘या’ देशात आढळला करोनाचा पहिला रुग्ण!
वाचा: करोनाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ तीन उपाय!

डॉक्टर हू यांच्या निधनानंतर चीनमध्ये प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर हू यांच्या निधनाबाबत रुग्णालयाच्यावतीने अधिक माहिती देण्यात आली नाही. करोनाच्या विषाणूची माहिती देणारे डॉ. ली वेनलियान्ग यांचाही करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. प्रशासनाला ली यांनी माहिती दिल्यानंतर त्यांना याबाबत काहीही वाच्यता न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांच्या मृत्यू पश्चात ली यांच्या कुटुंबीयांची प्रशासनाने आणि कम्युनिस्ट पक्षाने माफी मागितली होती.

आणखी वाचा:
सीमेवरील तणावानंतर चीनची भारताला ही ‘ऑफर’!

सीमेवर तणाव: तिबेटमध्ये चीनचा मध्यरात्री युद्धसरावSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Recent Comments