Home देश domestic flights will resume: आंध्र, प. बंगाल वगळता उद्यापासून देशांतर्गत विमान सेवा...

domestic flights will resume: आंध्र, प. बंगाल वगळता उद्यापासून देशांतर्गत विमान सेवा होणार सुरू – coronavirus lockdown india domestic flights will resume from monday no flights in west bengal and andhra


नवी दिल्लीः देशांतर्गत विमान सेवा उद्यापासून म्हणजे २५ मेपासून सुरू होत आहे. पण कुठल्या राज्यांमध्ये ही सेवा सुरू होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड हे राज्य तयार नव्हते. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अशातच नागरी हवाई उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून माहिती दिली आणि सर्व संभ्रम दूर केला. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्ये वगळता उद्यापासून देशांतर्गत विमान सेवा सुरू होईल, असं पुरी यांनी स्पष्ट केलंय.

आंध्र प्रदेशात २६ मे रोजी विमान सेवा सुरू होईल. तर पश्चिम बंगालमध्येही २८ मेपासून सुरू होईल. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी अम्फान महाचक्रीवादळ आले होते. या वादळात ८५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर जवळपास १ लाख नागरिकांना त्याचा फटका बसला. अनेक नागरिकांच्या घरांचं वादळात मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच कोलकाता विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. यामुळेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. पण २८ मेपर्यंत सर्व पायभूत सुविधा सज्ज केल्या जातील आणि पश्चिम बंगालमधील विमान सेवा सुरू करण्यात येईल.

विमान सेवा सुरू करण्यासाठी विविध राज्यांशी दिवसभर चर्चा करण्यात आली. मोठ्या प्रयत्नानंतर बरीच राज्ये तयार झाली, असं पुरी यांनी ट्विट करून सांगितलं. पण बऱ्याच राज्यांनी उड्डाण मर्यादित ठेवली आहेत. कोलकाता आणि बागडोग्रा या विमानतळांवर येत्या गुरुवारपासून फक्त २० उड्डाणांनाच परवानगी देण्यात आलीय. हैदराबाद विमानतळावर फक्त ३० उड्डाणांना परवानगी दिली गेलीय. यापैकी १५ विमानांच्या उड्डाणांना आणि १५ विमानांच्या लँडिंगला परवानगी दिली गेलीय. विजयवाडा आणि विशाखापट्टणम विमानतळावरील सेवा अजून सुरू होणार नाही.

महाराष्ट्र सरकारनेही संध्याकाळी उशिरा विमान सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली. मुंबई विमानतळावरून २५ विमानांचे उड्डाण आणि २५ विमानांच्या लँडिंगला परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. मुंबईतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मुंबईतून विमान सेवा सुरू करण्यास नाकर दिला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Recent Comments