Home संपादकीय donald trump visa policy: ट्रम्प यांची ‘व्हिसानीती’ - donald trumps usa visa...

donald trump visa policy: ट्रम्प यांची ‘व्हिसानीती’ – donald trumps usa visa policy


परदेशी नागरिकांना अमेरिकेत नोकरी करताना आवश्यक असलेला ‘एच-१बी’ व्हिसा स्थगित करून, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थानिकांना चुचकारण्याचा, तसेच करोनामुळे रोजगार गमावलेल्यांसाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे हजारो भारतीय व्हिसाधारकांना आणि तो मिळविण्याची आकांक्षा असणाऱ्या लाखोंना फटका बसला आहे; परंतु यामुळे खुद्द अमेरिकेचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय व्यवसाय आदी विविध क्षेत्रांतील उद्योगांत ‘एच-१बी’ व्हिसाद्वारे काम करणाऱ्यांचा अमेरिकी प्रगतीत मोठा वाटा आहे. पायाभूत सुविधा, पोषक वातावरण, नवकल्पनांना मिळणारा वाव, संशोधनाचे व्यावसायिक तंत्रज्ञानात रूपांतर होण्याच्या संधी यांमुळे भारतासह जगभरातील प्रतिभावान तरुण अमेरिकेत जाण्यास उत्सुक असतात. अशा कल्पक आणि गुणीजनांचे तिथे स्वागतही होत आले आहे. म्हणूनच नवनवीन तंत्रज्ञानाच्या आविष्कारात अमेरिका पुढे आहे. गेल्या तीन दशकांत भारतीय अभियंत्यांनी आणि तंत्रज्ञांनी अमेरिकेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तेथील सिलिकॉन व्हॅलीत भारताचा दबदबा आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’पासून ‘गुगल’पर्यंत आणि ‘अॅपल’पासून ‘अॅमेझॉन’पर्यंत अनेक कंपन्यांत भारतीय तंत्रज्ञ आहेत. काही भारतीय कंपन्यांनीही अमेरिकेत आपली मुद्रा उमटविली आहे. या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे आता ‘एच-१बी’ व्हिसाधारक भारतीय मिळणार नाहीत; त्यामुळे त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर टीकेची झोड उठविली आहे आणि तेथील तज्ज्ञांसह विरोधकांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. ‘एच-१बी’ आणि ‘एल-१’ व्हिसा स्थगित करण्यामुळे अमेरिकेच्या स्पर्धात्मकतेवर मोठा परिणाम होईल, अशी भीती या टीकाकारांना वाटते. परदेशातील प्रतिभावान तंत्रज्ञांकडे, अभियंत्यांकडे पाठ फिरवून अमेरिकेतील बेरोजगारांना संधी निर्माण होईल, असे ट्रम्प यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक बेरोजगारांसाठी ट्रम्प प्रशासनाने केलेली ही कृती म्हणजे ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ आहे; कारण ‘एच-१बी’ व्हिसाधारकांमुळे रिकाम्या होणाऱ्या जागा घेण्याइतपत प्रतिभावान स्थानिक मिळतील काय, असा प्रश्नही विचारला जात आहे.

ट्रम्प यांनी हे पाऊल उचलण्यामागचे कारण या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत दडले आहेत. ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देत, स्थानिकांना गोंजारत आणि राष्ट्रवादाला आवाहन करीत गेली निवडणूक जिंकलेल्या ट्रम्प यांना दुसरी संधीही सहज मिळेल, अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी होती; परंतु करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात त्यांना कमालीचे अपयश आले असून, जनमताचा झोका त्यांच्यापासून दूर जात असल्याचे चित्र आहे.

करोनाचे जगातील सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत, मृतांची संख्याही तिथेच सर्वांत जास्त आहे. करोनामुळे तिथे रोजगार गमावलेल्यांची संख्याही मोठी आहे. पोलिसांच्या अत्याचारामुळे जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर निर्माण झालेली संतापाची लाट अद्याप ओसरलेली नाही. यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण तयार होत असून, त्यांची लोकप्रियता वेगाने घसरत आहे. त्यांच्या विरोधातील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे. या परिस्थितीत आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी ट्रम्प अधिक जोरकसपणे ‘अमेरिका फर्स्ट’कडे जात आहेत. ‘एच-१बी’ व्हिसा स्थगित करण्याच्या त्यांच्या निर्णयाकडे या पार्श्वभूमीतूनही पाहावे लागेल. हा व्हिसा स्थगित केल्यानंतर सव्वा पाच लाख नवीन रोजगार अमेरिकींसाठी तयार होतील, असा दावा केला जात आहे. करोनामुळे रोजगार गमावलेल्यांची तेथील संख्या सुमारे चार कोटी आहे. शिवाय त्यांपैकी बहुतेक जण विविध प्रकारच्या सेवा उद्योगांतील आहेत; त्यामुळे ‘एच-१बी’ स्थगित केल्याचा लाभ अमेरिकींना कितपत घेता येईल, असा प्रश्न टीकाकार करीत आहेत. १९९६ ते २०११ या काळात अमेरिकेतील परदेशस्थांनी स्टार्टअप सुरू करण्याच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर अमेरिकींच्या स्टार्टअपच्या प्रमाणात दहा टक्क्यांनी घट झाली आहे; त्यामुळे या निर्णयाचा अपेक्षित लाभ मिळण्याला मर्यादा असल्याकडे, अशा प्रकारच्या आकडेवारीद्वारे लक्ष वेधले जात आहे.

जगभरातील प्रतिभावानांना आपल्याकडे खेचून घेणे, हे अमेरिकेचे मोठे कौशल्य होते. ते गमावण्याची तयारी ट्रम्प यांनी दर्शविली आहे. यामुळे अमेरिकेचा शेजारी असलेल्या कॅनडाचा लाभ होऊ शकतो. अमेरिकेला नकोसे झालेल्या तज्ज्ञांसाठी तो आपली दारे खुली करू शकतो. असे अनेक मुद्दे या निर्णयाच्या विरोधात पुढे येत आहेत. यामुळे हा निर्णय मागे घेण्याचा रेटा वाढत असला, तरी ट्रम्प ऐकतीलच असे नव्हे. ३१ डिसेंबरपर्यंत तरी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे बोलले जात आहे. या निर्णयामुळे ज्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे, त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांबाबत काय करावे, याचे धोरण संबंधित कंपन्यांना आखावे लागेल. करोनामुळे घरून काम करण्याची नवसाधारण स्थिती तयार झाली असली, तरी पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधाही महत्त्वाच्या आहेत. अमेरिकेबरोबरील मैत्री दृढ करीत असलेल्या भारताने हा मुद्दा उपस्थित करण्याचीही गरज आहे. त्याचबरोबर आपल्या प्रतिभावंतांना देशातच अधिक पोषकता निर्माण करण्यासाठीही प्रयत्न करायला हवे. हा कठीण आणि लांबचा मार्ग असला, तरी तोच देशासाठी अधिक हिताचा ठरणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

offsite atms: पुण्यात यापुढं फक्त बँकेच्या शाखेजवळच ATM सुविधा? – most of banks have decided to close offsite atm centres in pune

पुणे: बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी 'एटीएम' केंद्रे (ऑफसाइट एटीएम) बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शॉपिंग...

Narendra Modi Took His First Dose Of Covid 19 Vaccine At Aiims Delhi – लसीकरणाचा दुसरा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस...

हायलाइट्स:देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली लस६० वर्षांहून अधिक वयाच्या किंवा गंभीर आजारांशी झुंज देत असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या...

maharashtra budget session live updates: Maha Vikas Aghadi Government Prepared To Handle Opposition – Maharashtra Budget Session Live Updates: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

हायलाइट्स:राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासूनकरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्त्वाच्या घोषणांची शक्यतामराठा आरक्षण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणारराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

Recent Comments