सरकार सर्व स्तरावर फेल राज्यावर दुहेरी संकट ; मुख्यमंत्री दिनांक 24 मे ला देणार राजीनामा
Double crisis on fel state at all levels of government; CM to resign on May 24

कोरोना सारख्या महामारी व संसर्गजन्य रोगाचे वृत्तसंकलन करण्याकरता महाराष्ट्रातील अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाचे पत्रकार सदैव आपल्या कार्यात अग्रेसर असतात .त्यांना कुठलाही पक्ष नसतो डोळ्याने जी घटना दिसते ते प्रत्यक्षात कागदावर उतरवले जातात.
इलेक्ट्रॉनिक मिडीया सुद्धा अशाच पद्धतीने काम करतात .कोणत्याही पक्षाचा मीडिया गुलाम नसतो निपक्षपातीपणे कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता जीव धोक्यात घालून आमचे पत्रकार जीवाचे रान करून वृत्तसंकलन करीत असतात .कुठलेही पुरावे नसताना खोट्या बातम्या मान्यताप्राप्त वृत्त संस्थेकडून प्रसारित केल्या जात नाही.
वृत्तपत्र हे या देशाचे चौथे आधारस्तंभ आहे म्हणून एक जबाबदारी चे काम कसल्याही चुका न होऊ देता,अत्यंत प्रामाणिकपणे प्रसारमाध्यमातून केले जातात. पण काही राजकीय नेते व पक्ष आपल्या पदाचा दुरुपयोग करून या चौथ्या आधारस्तंभाला खिळखिळे करू पाहत आहे.
पत्रकारावर हमले तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे व त्याला गुन्हेगाराच्या चाकोरीत उभे करणे हा प्रकार राजकीय नेत्यांकडून नेहमीचा होऊन बसला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमाचे भवितव्य धोक्यात आले आहे .असाच एक प्रकार एबीपी माझाच्या राहुल कुलकर्णी नामक पत्रकाराच्या बाबतीत घडला आहे.गेल्या मंगळवारी एबीपी माझा च्या वृत्तवाहिनी वरून बंद रेल्वे सुरू होणार असे रेल्वे विभागाच्या हवाल्याने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते .
मात्र त्यानंतर सदर वृत्ताचा खुलासाही करण्यात आला होता व रेल्वे सुरू होणार नाही असे स्पष्टीकरणही प्रसारित करण्यात आले होते .सदर बातमी रेल्वेच्या कार्यालयाकडून मिळाल्याने प्रसारीत करण्यात आली होती.या बातमीचा संदर्भ घेऊन पोलिसांनी राहुल कुलकर्णी वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले व दिनांक 15 एप्रिल ला त्यांच्या घरून अटक केली .
बांद्रा रेल्वे स्टेशन वर हजारोच्या संख्येने आपल्या गावाला जाण्यासाठी परप्रांतीय लोक जमा झालेले असताना पोलीस काय करत होती.सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकानीं सदर अफवा पसरविल्याने या काळात लागू असलेल्या संचारबंदीची ऐसीतैसी झाली .
या रेल्वे परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी काय केले ?याठिकाणी जमा होत असलेल्या हजारो लोकांच्या मॉबला जमा होण्यास कोणी परवानगी दिली ? यावेळी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी कुंभकर्णी झोपेत होते काय ? असा प्रश्न प्रसारमाध्यमे विचारतील व पोलीस विभागातील काही कर्मचारी व अधिकारी निलंबित होतील या भीतीपोटी पोलीस विभागाने एबीपी माझाच्या पत्रकाराला बळीचा बकरा बनवले .
या घटनेचा मीडियाच्या अनेक संघटना कडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या देशाच्या तुलनेत जास्त आहे .तसेच मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे . राज्यशासनासाठी हि शरमेची बाब आहे .दुसऱ्या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था व प्रशासन ढेपाळले दिसते. राज्याचे गृह विभाग सक्षम नसल्याने लॉक डाउन असूनही नसल्या सारखेच चित्र दिसतय .पोलीस बळाचा वापर केला तर संचारबंदी यशस्वीपणे पार पडू शकते.
पण तसं होताना दिसत नाही .बांद्रा रेल्वे स्टेशनवरही पोलिसांनी घेतलेली नरमाईची भूमिकाच कारणीभूत आहे .याठिकाणी शासन कुठेतरी कमी पडते आहे असे दिसते .शासन आपले हे दोष लपविण्यासाठी मीडियाला दोषी ठरवत आहे. हा प्रकार म्हणजे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे .शासनाच्या या कृतीचा समाजाच्या सर्व स्तरातून व सर्व मीडियांनी तीव्र निषेध व्यक्त केला पाहिजे. सध्या राज्यावर राजकीय संकट येण्याची शक्यता आहे.
येत्या दिनांक 24 मे ला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.सध्या देशात व महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढतोय .रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन द्विधा अवस्थेत फसले आहे .कोणत्या मंत्र्यांना काय करावे हे सुचत नाही. एकीकडे महामारी पसरली आहे .लोकांना लॉकडाऊन मध्ये धान्य मिळत नाही .
उपासमारीचे संकटही आता राज्यापुढील आ करून उभे आहे. अशा अवस्थेत शासन मीडियाच्या जबर प्रश्नांच्या माऱ्याला हे शासन सामोरे जाऊ शकत नाही .त्यामुळे मीडियाच्या प्रतिनिधींची मुस्कटदाबी कशी करायची,याची रणनीती काही राजकीय नेते करीत आहेत. सदर घटनेचा लघु वृत्तपत्र संघटना तसेच मीडिया च्या सर्व वृत्त संस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला पाहिजे.
I’ve been browsing on-line more than 3 hours these days, but I never
found any attention-grabbing article like yours. It is pretty price enough for me.
Personally, if all web owners and bloggers made good content material as you probably did, the web will likely be a lot
more helpful than ever before. I love it when people get
together and share views. Great blog, stick with it!
Hey there would you mind letting me know which web
host you’re using? I’ve loaded your blog in 3 completely different
internet browsers and I must say this blog loads a lot faster then most.
Can you recommend a good hosting provider at a honest price?
Thank you, I appreciate it! http://vans.com
Contact Us At dnagpurvichar@gmail.com