Home शहरं औरंगाबाद dowry demand in aurangabad: पाच लाखांच्या हुंड्याची मागणी; सहांवर गुन्हा - demand...

dowry demand in aurangabad: पाच लाखांच्या हुंड्याची मागणी; सहांवर गुन्हा – demand of five lakh dowry crime on six


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साखरपुडा केल्यानंतर लग्न करण्यासाठी तरुणीच्या कुटुंबाकडे पाच लाख रुपयाची मागणी करण्यात आली. त्यामुळे हे लग्न मोडले असून याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार १८ एप्रिल २०१९ ते २० एप्रिल २०२० या काळात उस्मानपुऱ्यातील छोटा मुरलीधरनगर भागात घडला.

या प्रकरणी २३ वर्षांच्या पीडित तरुणीने तक्रार दाखल केली आहे. याच परिसरातील अर्जुन राजपाल घुसर आणि त्यांचे कुंटुबांनी दोन वेळेस या तरुणीला मागणी घातली होती. पण, तरुणास नोकरी नसल्याने नकार दिला होता. दरम्यान, त्यांनी पुन्हा नातेवाईकामार्फत गळ घातल्याने तरुणी आणि कुटुंबाने लग्नास होकार दिला.

अर्जून व तरुणीचा साखरपुडा २० एप्रिल करण्यात आला. एका महिन्यानंतर अर्जून आणि त्याच्या कुटुंबाने तरुणीच्या कुटुंबाकडे लग्नात पाच लाख रुपये हुंडा, लग्न थाटामाटात आणि भरभरून भेटवस्तू द्याव्यात, अशी मागणी घातली. त्याला तरुणीच्या कुटुंबाने नकार दिल्याने हे लग्न मोडले. या प्रकरणी तरुणीने फसवणूक तसेच आपली समाजात बदनामी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यांच्यावर गुन्हा

अर्जून राजपाल घुसर, विजय घुसर, राजेश घुसर, राम बलराज बोहोत आणि दोन महिला (सर्व रा. छोटा मुरलीधरनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Made in India Metro: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first india made metro will be in mumbai on 27 january

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

LIVE : गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील 150 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments