Home शहरं नागपूर dr pravin gantawar assets: Pravin Gantawar नागपूर पालिकेत चाललंय काय; 'या' वैद्यकीय...

dr pravin gantawar assets: Pravin Gantawar नागपूर पालिकेत चाललंय काय; ‘या’ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे घबाड! – case registered against medical officer pravin gantawar for unaccounted assets


नागपूर: नागपूर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण मधुकर गंटावार (वय ४८) व त्यांच्या पत्नी शिलू प्रवीण गंटावार (वय ४५,दोन्ही रा. फॉर्च्युन रेसिडेन्सी,रामदास) यांनी गैरमार्गाने अडीच कोटींची मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणात लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने गंटावार दाम्पत्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. गंटावार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने महापालिका व वैद्यकीय क्षेत्रात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. ( Dr Pravin Gantawar Unaccounted Assets )

गंटावार दाम्पत्याने पदाचा गैरवापर करून कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याची तक्रार २०१५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंटावार दाम्पत्याविरुद्ध आलेल्या तक्रारीची उघड चौकशी सुरू केली. २००७ मध्ये गंटावार हे महापालिकेच्या इंदिरा गांधी रुणालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. २००७ ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील त्यांचे वेतन, उत्पन्न , चल व अचल संपत्ती, मालमत्ता विक्रीपासून मिळालेले उत्पन्न, मुदतठेवीवरील रक्कम, व उत्पन्नाच्या स्त्रोतांची चौकशी करण्यात आली. तसेच महापालिका, संबंधित बँक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दुय्यम निंबधक कार्यालय, भारतीय आर्युविमा महामंडळ, मुलांच्या शैक्षणिक संस्थांकडून प्रवीण गंटावार यांच्याबाबत लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने माहिती मागवली.

लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने गंटावार दाम्पत्याच्या रामदासपेठेतील हॉस्पिटलच्या दस्तऐवजांचीही सखोल चौकशी केली. डॉ. प्रवीण गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ. शिलू गंटावार यांनी लोकसेवक पदाचा गैरवापर करून दोन कोटी ५२ लाख ८५ हजार ७६२ रुपयांची अर्थात एकूण वैध उत्पन्नाच्या ४३ टक्के अधिक अपसंपदा जमविल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोनाली चौधरी, लक्ष्मण परतेती व गीता चौधरी यांनी गंटावार दाम्पत्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये अपसंपदेचा गुन्हा दाखल केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Petrol Rate today: पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर – Petrol Diesel Rate Today

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी सलग २५ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल...

समतोल नेतृत्व : वावेल रामकलावन

'ना कुणी पराभूत झालाय, ना कुणी विजयी. हा आपल्या देशाचा विजय आहे. आपल्या मातृभूमीतील एखाद्याचे योगदान संपुष्टात आणणे, हा एखाद्या निवडणुकीचा अर्थ असू...

shinco smart tv offers: ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ८ हजार ९९९ रुपयांत – shinco announces amazing discounts and offers on its...

नवी दिल्लीः फेस्टिवल सीजनमध्ये तुम्हाला जर इंडियन ब्रँडचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर शिंको कंपनीने तुमच्यासाठी खास अॅमेझॉनवर बेस्ट डील आणली आहे....

Recent Comments