Home शहरं कोल्हापूर Dr Tatyarao Lahane: डॉ. तात्याराव लहाने यांना यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार...

Dr Tatyarao Lahane: डॉ. तात्याराव लहाने यांना यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार जाहीर – rajarshee shahu puraskar declared to dr tatyarao lahane


कोल्हापूरः यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केली.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत ३४ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. गतवर्षी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. लहाने यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी यंदा ३५ व्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. एक लाख रूपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वाचाः करोनामुक्त रुग्णांमध्ये आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला धक्का

दरवर्षी २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी या पुरस्काराचे वितरण केले जाते. यावेळी मात्र हा पुरस्कार करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर समारंभपूर्वक वितरित करण्यात येणार आहे. करोना चा प्रादुर्भाव लवकर कमी न झाल्यास त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आहे. डॉ. लहाने यांना २००८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. बिनटाक्याच्या नेत्र शस्त्रकियेसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी दीड लाखाहून अधिक लोकांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने दिला गेलेला हा पुरस्कार मी देशातील सर्वात मोठा पुरस्कार मानतो. या पुरस्काराने मला अत्यानंद झाला असून एवढा मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे

डॉ. तात्याराव लहाने

वाचाः आशा सेविकांच्या मानधनात वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

लातूर जिल्ह्यातील मेकगाव हे तात्याराव लहाने यांचे जन्म गाव असून ‘कमवा व शिका’ या योजने अंतर्गत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मराठवाडा विद्यापीठातून १९८१ मध्ये मेडिसीन क्षेत्रात पदवी घेतली.१९८५ मध्ये त्याच विद्यापीठातून नेत्ररोग शास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी पदवी घेतली. त्यांनी आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून १२ ते १४ तास रुग्णालयात काम करत होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नेत्र शिबिरांमध्ये विशेषत: बीना टाक्यांची शस्त्रक्रियामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. मोतीबिंदूंची गुंतागुंत असलेल्या २०६१ कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया केली आहे. बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात आशा शस्त्रक्रियेमुळे ३५ टक्यांवरुन १ टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे. यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करुन अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments