Home महाराष्ट्र drown in waterfall: जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात बुडून पाच जणांचा मृत्यू - 5...

drown in waterfall: जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात बुडून पाच जणांचा मृत्यू – 5 young drown in kalmandvi waterfall in jawhar


जव्हारःजव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काळमांडवी धबधब्यावर ही मुलं पोहोण्यासाठी गेली होती. ही सर्व मुलं अंबिका चौक येथे राहणारी असून आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

पावसाळा सुरू झाल्यानं जव्हार तालुक्यातील धबधबे पुन्हा एकदा खळाळू लागले आहेत. दरम्यान, धबधब्यावर फिरायला जणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढते आहे. जव्हारहुन सात किमी अंतरावर केळीचापाडा (काळशेती ) येथं हा धबधबा आहे. आज ११ ते १२ युवक धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यातील पाच युवकांना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत आहे, येथे पावसाळ्यात खाली उतरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते, यात तीन मोठ मोठे पाण्याचे डोह आहेत, मात्र तेथील काही मुलांना खोलीचा अंदाज न आल्यामुळे या डोहात एकाच वेळी ५ मुले बुडाले असल्याची घटना घडली आहे.

एखादाच माझ्या सारखा असतो त्याला मरण नसतंः उदयनराजे भोसले

बुडालेल्या पाचही जणांना शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. त्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. याबाबत जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे हे स्वतः घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.

maharashtra timesSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments