Home शहरं पुणे dsk’s seized house: DSK यांच्या घरातील २ श्वान, ६ मांजरींसाठी कोर्टात अर्ज...

dsk’s seized house: DSK यांच्या घरातील २ श्वान, ६ मांजरींसाठी कोर्टात अर्ज – pets trapped inside dsk’s seized house request to send them to pune based animal welfare ngo


पुणे: गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात ईडीनं उद्योजक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांचे पुण्यातील घर जप्त केले आहे. या घरातील दोन श्वान आणि सहा मांजरांच्या देखभालीसाठी कुणी नाही. ते उपाशी राहून मरू शकतात. त्यामुळं त्यांना रेस्क्यू या संस्थेकडे सोपवण्यात यावे, अशी विनंती शिरीष कुलकर्णी यांनी कोर्टात केली आहे.

डीएसके यांच्या घरातील दोन श्वान आणि सहा मांजरे रेस्क्यू या संस्थेकडे दिली जावीत, अशा विनंतीचा अर्ज शिरीष कुलकर्णी यांनी अॅड. आशिष पाटणकर आणि अॅड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत कोर्टात केला आहे. या घरातील श्वान आणि मांजरांच्या देखभालीसाठी कुणीही नाही. लॉकडाऊनमुळं या घराचे सुरक्षा रक्षक हे निघून गेले आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी येथे कुणी नाही. ते अन्नपाण्यावाचून तडफडून मरू शकतात. त्यामुळं त्यांना रेस्क्यू संस्थेकडे देण्यात यावे, असं अर्जात म्हटलं आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ईडीनं डीएसके यांचे सेनापती बापट मार्गावरील घरावर जप्तीची कारवाई केली होती. त्या घरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तेव्हापासून या घरातील दोन श्वान आणि सहा मांजरे येथे अडकली आहेत. लॉकडाऊन असल्यानं येथील सुरक्षा रक्षकही निघून गेले आहेत. या घरातील हे पाळीव प्राणी अन्नपाण्यावाचून मरू शकतात. काही दिवसांपूर्वी परिसरातील काही प्राणीप्रेमींनी या प्राण्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करून चिंता व्यक्त केली होती.

‘डीएसकें’विरुद्ध दिवाणी दावा दाखल
पोलिसांनी मागितली गुंतवणूकदारांकडे माहिती
डीएसकेंची गाडी मुंबईतून जप्तSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

corona latest updates: coronavirus in maharashtra updates: आजही नव्या करोनारुग्णांच्या संख्येत ८ हजारांहून अधिक वाढ – coronavirus latest updates maharashtra registers 8702 new covid...

हायलाइट्स:आज दिवसभरात तब्बल ८ हजार ७०२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ८०७ इतकी होती. तर, आज ३...

Recent Comments