Home आपलं जग करियर DU Open book test: दिल्ली विद्यापीठाची ओपन बुक टेस्ट लांबणीवर - delhi...

DU Open book test: दिल्ली विद्यापीठाची ओपन बुक टेस्ट लांबणीवर – delhi university postpones open book test for ten days


DU Open Book Test: दिल्ली विद्यापीठाने अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ओपन बुक परीक्षा (OBT) पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा १ जुलैपासून सुरू होणार होत्या. पण त्या आता आणखी दहा दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविड – १९ विषाणूची लागण होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने विद्यापीठाने हा निर्णय घेतला.

सर्व पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नवे वेळापत्रक ३ जुलै रोजी जाहीर करणार असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे. या ओपन बुक टेस्टला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सातत्याने विरोध होत आहे. आपल्या मूळ घरी परतलेल्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य नाही, पुस्तके, नोट्स नाहीत, तसेच अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे, असे असताना या परीक्षा घेणे अयोग्य असल्याचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

‘सर्व यूजी, पीजी, SOL, NCWEB शाखांच्या अंतिम सत्र परीक्षा, ज्या ओपन बुकच्या माध्यमातून होणार होत्या, त्या १० दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविड-१९ महामारीच्या स्थितीत सुधारणा न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असं दिल्ली विद्यापीठाच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत सर्व संबंधित विशेषत: विद्यार्थ्यांना या परीक्षा अटेंड करण्यात समस्या येऊ शकतात, त्यामुळे तूर्त तरी १० दिवसांसाठी त्या पुढे ढकलण्यात आल्याचे या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. या परीक्षांचे नवे वेळापत्रक ३ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल आणि १० जुलैपासून या परीक्षांना सुरुवात होईल, असं या नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सीबीएसई १० वी, १२ वी म्यूल्यांकनाचा ‘असा’ आहे फॉर्म्युला
दिल्लीतील शाळा ३१ जुलैपर्यंत बंद राहणार

दिल्लीत सध्या करोना संक्रमणाची स्थिती अतिशय गंभीर आहे. शुक्रवारी २६ जूनपर्यंत दिल्लीतील कोविड -१९ संक्रमित लोकांची संख्या ७७,२४० वर पोहोचली आहे. २,४९२ जणांचा मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bharti Singh and Haarsh Limbachiyaa Gets Bail in Drug Case NCB – अमली पदार्थ प्रकरणात भारती आणि हर्ष यांना दिलासा; जामीन मंजूर

मुंबई: अमली पदार्थ प्रकरणात अटकेत असलेली कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना रविवारी सुटीकालीन न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली...

Recent Comments