Home शहरं औरंगाबाद due to some industries corona spread: काही उद्योगांमुळे करोना फैलाव ? -...

due to some industries corona spread: काही उद्योगांमुळे करोना फैलाव ? – corona spread due to some industries?


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर व परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज १०० रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने निर्माण झालेल्या हॉटस्पॉटमध्ये काही उद्योगांमधून फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

करोना लॉकडाऊनच्या काळात नियम व अटींच्या अधीन राहून केंद्र व राज्य सरकारने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत शहरातून येण्या जाण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. शहरातील करोनाचा फैलाव ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला होता. मात्र, औद्योगिक संघटना, उद्योजकांनी केंद्र व राज्य सरकारकडे मागणी केल्यानंतर परवानगी दिली गेली. उद्योगांनी कामगार, अधिकाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय कंपनीत करावी, सुरक्षित वावर, वैद्यकीय सुविधा तसेच सॅनिटायझर व अन्य सुविधा पुरवाव्यात असे सांगण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी अनेक उद्योगांनी केली. औरंगाबाद परिसरात ४००० हून अधिक उद्योग सुरु झाले असून दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सूत्रांनी, दिलेल्या माहितीनुसार त्यात उद्योगात बाधित झालेल्या रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर असल्याचे समोर आले आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील काही मोठ्या उद्योगांमधील कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. हा आकडा नेमका स्पष्ट झाला नसला तरी औद्योगिक, प्रशासकीय वर्तुळात गेल्या चार दिवसांपासून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर परिसरात वाढलेली रुग्णसंख्याही त्याचाच एक भाग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. भविष्यात करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोरची डोकेदुखी मात्र वाढली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments