Home आपलं जग करियर e pathshala : ऑनलाइन अभ्यासासाठी ई-पाठशाला है ना - lockdown e pathshala...

e pathshala : ऑनलाइन अभ्यासासाठी ई-पाठशाला है ना – lockdown e pathshala mhrd online portal for online study


आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

ई-पाठशाला हे पोर्टल भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी २०१५ साली सुरु केलं आहे. ई-पाठशालामध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक, संशोधक आणि एज्युकेटर यासाठी सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य ऑनलॉइन उपलब्ध करुन दिले आहे. ई-पाठशालाची वेबसाइट आहे, तसंच मोबाइल वा टॅबलेटसाठी अॅप देखील उपलब्ध आहेत. अँड्राइड मोबाइल फोनसाठी गुगल प्ले स्टोअर, अॅपल मोबाइल फोनसाठी अॅपल स्टोअर आणि विंडोजसाठी मायक्रोसॉफ्ट स्टोअर इत्यादींवर ई-पाठशाला अॅप उपलब्ध आहे. ई-पाठशालावरील साहित्य हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहे.

ई-पाठशालामध्ये विद्यार्थ्यांसाठी खालील गोष्टी उपलब्ध आहेत.

– पहिली ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तकं (सीबीएससी बोर्डासाठीची पुस्तकं) इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषांमधून उपलब्ध आहेत. विद्यार्थी ही पुस्तकं कम्प्युटर, टॅबलेट, लॅपटॉप वा मोबाइलवर मोफत डाऊनलोड करुन वाचू शकतात.

– विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी पूरक साहित्य उपलब्ध आहे.

– विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देखील दिली जाते.

– विविध विषयांवरील माहितीसाठी आणि अभ्यासाच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काही ऑडिओ-व्हिडीओ संसाधनं उपलब्ध आहेत.

ई-पाठशालामध्ये शिक्षकांसाठी खालील गोष्टी उपलब्ध आहेत.

– पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तकं.

– शालेय शिक्षणातील प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना कसं शिकवावं यासंबंधीच्या अध्ययन सूचना पुस्तिका उपलब्ध आहेत.

– विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेली लर्निंग आऊटकम मिळवण्यासाठी करावयाच्या गोष्टी

– ऑडिओ-व्हिडीओ संसाधन

– शिक्षणासंबंधी उपयुक्त नियतकालिके आणि जर्नल्स

– शिक्षणविषयक विविध अहवाल, समित्यांचे रिपोर्टस, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कसंबंधीचे साहित्य इत्यादी देखील उपलब्ध आहे.

– ई-पाठशालामध्ये पालकांसाठी आणि शिक्षणतज्ज्ञांसाठीदेखील निवडक मॉड्यूल्स उपलब्ध आहेत.

ई-पाठशालासंदर्भातील अधिक माहिती http://epathshala.nic.in/ या वेबसाइटवरून घेता येईल. सीबीएसइ बोर्डाच्या शाळा एनसीईआरटीद्वारे तयार केलेली पाठ्यपुस्तके वापरतात. या पाठ्यपुस्तकाबरोबर काही पूरक साहित्य सीबीएसई तयार करते. सीबीएसईची सर्व पुस्तकं ही इयत्तानिहाय http://cbse.nic.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

दहावीच्या मुलांसाठी अभ्यासाची ‘दशपदी’

नेस्ट स्कॉलरशीप २०२०: ४० हजारांपर्यंतची शिष्यवृत्ती

अॅप्लिकेशन प्रोग्रामर बना; लाखो कमवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

whatsapp mute video feature: WhatsApp Mute Video फीचर सर्वांसाठी लाँच, जाणून घ्या वापरण्याची पद्धत – whatsapp mute video feature is now available for android...

हायलाइट्स:WhatsApp Mute Video फीचर आले सर्वांसाठी हे फीचर रोल आउट करण्यात आले जाणून घ्या वापरण्याची पद्धत नवी दिल्लीः WhatsApp Mute Video फीचरला अखेर...

Karnataka: मुलीशी मैत्री केल्याने मुलाची हत्या; हत्येपूर्वी नाक, गुप्तांग कापून मृतदेह नदीत फेकला – karnataka 14 year old boy killed over friendship with girl...

हायलाइट्स:१४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्याहत्येपूर्वी मुलाचे नाक आणि गुप्तांग कापलेमृतदेह भीमा नदीपात्रात फेकलाकर्नाटकातील कलबुर्गीमधील धक्कादायक घटनाकलबुर्गी: मुलीसोबत मैत्री केली म्हणून एका १४ वर्षीय...

SBI Home Loan Interest Rate: कर्ज झालं स्वस्त; भारतीय स्टेट बँकेची ‘या’ ग्राहकांसाठी गृहकर्जावर विशेष सवलत – Sbi Reduce Home Loan Rate For Limited...

हायलाइट्स:'एसबीआय'चे गृहकर्ज दर सिबिलशी संलग्न आहेत. चांगला सिबिल असणाऱ्या ग्राहकांना सवलतीत मिळणार गृहकर्जआज बँकेने व्याजदरात केली ०.७० टक्के कपातमुंबई : तुम्ही जर गृहकर्ज...

Recent Comments