Home शहरं मुंबई e-sanjeevani opd app: ई-संजीवनी ओपीडी अॅप तयार - create e-sanjeevani opd app

e-sanjeevani opd app: ई-संजीवनी ओपीडी अॅप तयार – create e-sanjeevani opd app


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. राज्यभरात आतापर्यंत एक हजार ६०६ जणांनी यासेवेचा लाभ घेतला आहे. आता करोनामुळे खासगी रुग्णालये बंद असल्याने सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे.

याआधी ही सेवा केवळ संगणक आधारित असल्याने त्याच्या वापरावर मर्यादा होत्या. आता ॲण्ड्राइड आधारित ॲप तयार झाल्याने त्याचा फायदा स्मार्टफोनधारकांना घेता येईल. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येईल. आतापर्यंत १,६०० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे, असे टोपे म्हणाले.

असे आहे ॲप

– नोंदणी करणे – मोबाइल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.

लॉगइनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगइन करता येते.

– डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments