Home आपलं जग करियर balbharati : बालभारती @ ऑनलाइन - e textbooks available for all stds...

balbharati : बालभारती @ ऑनलाइन – e textbooks available for all stds on balbharati

> आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

यंदा आठवीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक कामगिरीवर पुढील वर्षात प्रवेश दिले आहेत. इयत्ता नववी आणि अकरावी बाबतीतही हाच निर्णय घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांच्या काही पालकांसमोर आता घरी बसलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होणार हा प्रश्न आहे. शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं कुठे आणि कधी उपलब्ध होणार? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. सध्या पालक घरीच असल्यानं ते थोडा वेळ तरी पाल्यांच्या शिक्षणात लक्ष घालू शकतात. लॉकडाऊन संपण्याची वाट न बघता विद्यार्थ्यांना आपला अभ्यास लगेच सुरु करण्यासाठी ई बालभारती हा उत्तम मार्ग ठरेल.

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमांची पुस्तकं पाठ्यपुस्तक मंडळानं आपल्याला ई-बालभारतीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहेत. पहिली ते दहावीपर्यंत सर्व भाषिक माध्यमातील पुस्तकं आणि अकरावी-बारावीची मराठी व इंग्रजी माध्यमाची पुस्तकं ई बालभारतीवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत. ही पुस्तकं मोबाइल, कम्प्युटरवर डाऊनलोड करता येतील. यासाठी www.ebalbharati.in ही वेबसाइट पाहावी.

पाठ्यपुस्तक मंडळाने ई-बालभारतीच्या माध्यमातून ई-बालभारतीच्या मोबाइल अॅपची (ebalbharati app) निर्मितीदेखील केली आहे. हे मोबाईल अॅप गुगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. या मोबाइल अॅपवर पुढील अध्ययन साहित्य उपलब्ध आहे.

० आठवी ते दहावी या वर्षांचे विज्ञान, भूगोल आणि संस्कृत विषयांचे व्हिडीओ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये विषयनिहाय धड्यांचे सादरीकरण, प्रात्यक्षिक कार्य इत्यादीचा समावेश आहे.

० आठवी ते दहावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांची बोलकी पुस्तकं (टॉकिंग बुक्स) उपलब्ध आहेत. दिव्यांग विद्यार्थी आणि अन्य विद्यार्थीदेखील या सुविधेचा फायदा घेऊ शकतील.

० पाठ्यपुस्तक मंडळाचे स्वतंत्र युट्यूब चॅनल आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या मदतीनं पाठ्यपुस्तक मंडळानं आठवी ते दहावी या इयत्तांचे व्हिडीओ तयार केले आहेत. हे व्हिडीओ युट्यूब चॅनेलवर पाहता येतील. याबरोबरीनेच दहावीतून अकरावीत जाताना अकरावीतील सर्व विषयांच्या संदर्भात विषयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे व्हिडीओ विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जेणेकरून, विद्यार्थ्यांना विषयाचे अध्ययन नेमकं कसं करावं, विषयांमध्ये कोणकोणते घटक अभ्यासावे लागणार आहेत याबाबत माहिती मिळेल.

० या मोबाइल अॅपमध्ये दहावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमातून तयार केलेले ई-लर्निंग अध्ययन साहित्य खूपच उपयुक्त आहे. या अध्ययन साहित्यामध्ये संपूर्ण इंटरअॅक्टीव्ह स्वरुपात प्रत्येक पाठाचं सादरीकरण करण्यात आलं आहे. याबरोबरीनेच प्रत्येक पाठावर आधारित विविध स्वाध्याय, प्रश्नसंच आणि विशेष कृती इत्यादीचा समावेश आहे. यासाठी https://learn.ebalbharati.in/ ही वेबसाइट पाहावी.

‘किशोर’ वाचण्यासाठी…

लॉकडाऊनच्या काळामध्ये अवांतर वाचनासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळामार्फत प्रकाशित करण्यात येणारे ‘किशोर’ मासिक ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. १९७१ पासूनचे किशोरचे अंक वाचनासाठी उपलब्ध आहेत. या अंकामधून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती, तज्ज्ञांचे विचार, कथा आणि काही घरी करावयाची प्रात्यक्षिकं इ. माहिती घेता येईल.

किशोरच्या अंकासाठी वेबसाइट- http://kishor.ebalbharati.in/Archive/

पालकांसाठी त्यांच्या काळातीलही बालभारतीची पुस्तकं अर्काइव्हजमध्ये वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.

शिष्यवृत्ती, टीईटीचा निकालही लांबणार

१२ वी नंतर करा हा कोर्स; घरबसल्या डिग्री!

डिजिटल मार्केटिंगमधलं करिअर: काळाची गरज

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sensex today: शेअर बाजार ; सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले – sensex nifty gain today

मुंबई : सकाळच्या सत्रात ४०० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर १६३ अंकांच्या वाढीसह स्थिरावला. तो ४०७०७ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी...

Bombay high court: डॉक्टरला मारहाण; एक लाखाचा दंड – beating the doctor; a fine of one lakh

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन काळात सर्व लोक घरात असताना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांपासून दूर...

KXIP vs DC Excellent Bowling From Ashwin To Get The Wicket Of Dangerous Universal Boss – आधी फलंदाजाच्या बुटाची लेस बांधून दिली, मग बोल्ड...

दुबई: आयपीएलमध्ये काल झालेल्या ३८व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीने विजयासाठी दिलेले १६५ धावांचे लक्ष्य पंजाबने १९व्या षटकात ५...

Recent Comments