Home आपलं जग करियर educational channels: प्रत्येक इयत्तेसाठी एक वाहिनी; लवकरच शिक्षणासाठी १२ नव्या वाहिन्या -...

educational channels: प्रत्येक इयत्तेसाठी एक वाहिनी; लवकरच शिक्षणासाठी १२ नव्या वाहिन्या – central government to start 12 new swayam dth channels, online courses by top 100 universities says nirmala sitharaman


नवी दिल्ली:
शालेय मुलांच्या दृकश्राव्य शिक्षणासाठी १२ वाहिन्या सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी मुलांच्या शिक्षणासाठी ‘वन क्लास वन चॅनल’ योजनेंतर्गत १२ नवीन वाहिन्या सुरू करण्याची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत शिक्षणासाठी केंद्र सरकार काय उपाययोजना करणार आहे, याची माहिती सीताारामन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

त्या म्हणाल्या की, स्वयंप्रभा आणि डीटीएचच्या माध्यमातून यापूर्वीच मुलांना शिक्षण दिले जात आहे आणि आता १२ नवीन वाहिन्या त्या अंतर्गत आणल्या जातील. खेड्यातील मुलंही या वाहिन्यांवरील अभ्यासाचा लाभ घेऊ शकणार आहेत.

पदवी परीक्षा रद्द करा; मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन याचिका

सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान ई-विद्या कार्यक्रम लवकरच सुरू केला जाईल. शिक्षणासाठी नवीन व्यासपीठ सुरू करण्याची घोषणा करताना अर्थमंत्री म्हणाल्या की प्रत्येक इयत्तेसाठी एक टीव्ही चॅनेल असेल आणि रेडिओ व कम्युनिटी रेडिओचा उपयोग केला जाईल. अर्थमंत्र्यांनी देशातील १०० टॉप विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिल्याचीही घोषणा केली.

मुंबईसह राज्यातल्या आणि अन्य नोकरभरती एका क्लिकवर

करोना साथीच्या आजाराला ढासळलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील उपाययोजनांबद्दल सीतारामन रविवारी बोलत होत्या. देशापुढील आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

opposition parties boycotting presidents address: ​कृषी कायद्यांना विरोध; संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार – farm laws 16 opposition parties that were boycotting presidents address

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या ( parliament budget session ) पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( president's address ) यांचे २९ जानेवारीला संसदेत...

Coronavirus vaccination: Coronavirus vaccination करोना लस घेण्याची घाई नडली; सीईओला नोकरी गमवावी लागली! – canadian casino company ceo jumped vaccine queue with wife, lost...

हायलाइट्स:करोना लस टोचून घेण्यासाठी खोटी ओळख सांगितली.करोनाची लस घेण्यासाठी दुसऱ्या भागात प्रवास, क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर कंपनीने घेतला सीईओपदाचा राजीनामाओटावा:...

Tata Capital Launches Shubharambh Loans – वाहन कर्ज ते गृह कर्ज ; टाटा कॅपिटलने आणली नवीन कर्ज योजना | Maharashtra Times

हायलाइट्स:प्रत्येक कर्ज योजनेमध्ये विशेष आर्थिक लाभ'शुभारंभ लोन्स' प्रचारासाठी कंपनीची मोहीमसहा प्रकारची कर्जे मिळणारमुंबई : टाटा समूहातील आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी टाटा कॅपिटलने २०२१...

Recent Comments