Home देश पैसा पैसा 'EMI'चे टेन्शन; 'मोरॅटोरियम'चा कालावधी वाढणार

'EMI'चे टेन्शन; 'मोरॅटोरियम'चा कालावधी वाढणार


वृत्तसंस्था, मुंबई : करोना विषाणूमुळे पडलेला आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोरॅटोरियमची सुविधा (कर्जहप्ते लांबणीवर टाकण्याची योजना) आणखी तीन महिने वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या मध्यावधीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक उद्योगांनी चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी व्यवसाय चालू होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे बँकांना कळवले आहे. त्यातच जमा रकमेचे व्याज कोणत्याही परिस्थितीत ३१ मे नंतर करण्याची शक्यताही नाही. त्यामुळे मोरॅटोरियमचा कालावधी वाढविण्याची सूचना काही बँकांनी रिझर्व्ह बँकेला केली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातीव बँकांच्या प्रमुखांसमवेत चर्चा केली. या बैठकीत अनेक बँकांनी मोरॅटोरियमचा कालावधी आणखी ९० दिवसांनी वाढविण्याची सूचना केली आहे. बँकांच्या मते या अतिरिक्त अवधीनंतर व्यवसायात अतिरिक्त रोख तरलतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. बँकांनी दिलेल्या माहितीनंतर केलेल्या सूचनेवर रिझर्व्ह बँकेने कोणतेही आश्वासन दिलेले नसून, वाढते लॉकडाउन पाहता या समस्येत भर पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

क्रेडिट फ्लोवरही झाली चर्चा
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी बँकांच्या प्रमुखांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन विविध सत्रांमध्ये चर्चा केली. या बैठकीत मोरॅटोरियमव्यतिरिक्त अर्थव्यवस्थेतील अन्य क्षेत्रांवरही चर्चा करण्यात आली. या शिवाय विविध क्षेत्रांतील क्रेडिट फ्लोवरही चर्चा करण्यात आली. या शिवाय एनबीएफसी, मायक्रोफायनान्स संस्था, हाउसिंग फायनान्स कंपन्या आणि म्युच्युअल फंडांच्या रोख तरलतेवरही चर्चा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांच्या आंतरराष्ट्रीय शाखांच्या कामकाजावरही चर्चा केली.

वाचा :

दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था घसरणार?
एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या कालखंडानंतर मोठी घसरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण करोना विषाणूमुळे आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झआले आहेत. तत्पूर्वी केंद्र सरकारने १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्या अंतर्गत करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली. शिवाय पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात दरमहा पाचशे रुपये टाकून रूतलेल्या अर्थचक्राला गती देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

रेपो दरांत ०.७५ टक्के कपात

बँकांकडून अधिक कर्ज घेण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मुख्य व्याजदरात (रेपो दर) ०.७५ टक्क्यांची घट करून ते ४.४ टक्क्यांवर आणले आहेत. या शिवाय रिव्हर्स रेपो घटवून ३.७५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. जेणेकरून बँकिंग प्रणालीत मोठ्या प्रमाणात निधी निर्माण होईल, असेही शक्तिकांत दास यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Indo Nepal border: नेपाळ पोलिसांकडून गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, एक बेपत्ता – indian national killed, one missing after police firing by nepal police

हायलाइट्स:सीमेवर नेपाळ पोलीस आणि तीन भारतीय नागरिकांत बाचाबाचीएका भारतीय नागरिकावर नेपाळ पोलिसांचा गोळीबारझटापटी दरम्यान सीमा पार करण्यात यशस्वी ठरल्यानं एकाचा जीव वाचलातिसरा साथीदार...

All India Marathi Literary Meet: साहित्य संमेलन मेअखेरीस? – all india marathi literary meet program will be postpone in may month due to coronavirus

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात २६ ते २८ मार्च या काळात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिनाअखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा...

Violence against women: बलात्कारी डॉक्टर गजांआड – aurangabad municipal corporation has suspended to rapist doctor

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल महिलेला डिस्चार्ज देण्यासाठी केबिनमध्ये बोलावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरला महापालिकेने गुरुवारी बडतर्फ केले. कोव्हिड केअर...

Recent Comments