Home शहरं मुंबई energy minister nitin raut: थकित वीज बिलांवर व्याज - msedcl will charges...

energy minister nitin raut: थकित वीज बिलांवर व्याज – msedcl will charges interest on electricity bill if consumer not paid bills


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

वीज बिलांमध्ये सवलत दिली जाणार नसल्याचे स्वत: ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर आता महावितरणने आणखी एक बडगा उगारला आहे. ग्राहकांना तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मुभा आहे; पण या हप्त्यांवर वार्षिक १२ टक्के व्याज आकारणारच, असे महावितरणने परिपत्रकात म्हटले आहे.

‘ग्राहकांना वीज बिलांमध्ये सवलत देता येणार नाही. त्याऐवजी हप्त्यांची योजना आणली आहे’, असे सांगत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपलेच आश्वासन मागे घेतले होते. परंतु राज्य सरकारच्या महावितरण कंपनीची ही हप्त्याची योजनाही ग्राहकांवर व्याजभार लादणारी असल्याचे परिपत्रकात समोर आले आहे. महावितरणने विविध श्रेणींसाठी ही योजना आणली आहे. त्यानुसार थकबाकी असलेल्या ग्राहकांसह ऑक्टोबरच्या वीजवापराचे नोव्हेंबरमध्ये येणारे बिलासाठी तीन हप्त्यांची सुविधा असेल. मात्र, त्यावर विलंब आकार व व्याज भरावे लागेल. कुठलीही थकबाकी नसलेल्या ग्राहकांना विलंब आकार ग्राह्य धरून त्यानुसार तीन हप्ते पाडून दिले जातील. थकबाकी असलेल्या ग्राहकांना थकबाकीच्या रकमेवर वार्षिक १२ टक्के व्याज दरासह हप्ते पाडून दिले जातील. या हप्त्यांसाठी ग्राहकाने किमान ३० टक्के रकमेचा आगाऊ भरणा करणे अत्यावश्यक असेल. त्यानंतर उर्वरित रकमेवर व्याजासह हप्ते पाडून दिले जातील. मुख्य म्हणजे, ही ३० टक्के रक्कम ग्राहकांना हप्ता मंजूर झाल्यानंतर सात दिवसांमध्ये भरायची आहे. वीज मीटर कापल्या गेलेल्या ग्राहकांना थकबाकीवर १०० टक्के विलंब आकार व १२ टक्क्यांनुसार येणाऱ्या व्याजाची किमान ५० टक्के रक्कम अनिवार्य असेल. उर्वरित ५० टक्के व्याजमाफी असेल.

अनेक ग्राहकांना लॉकडाउन काळात वीज वापर नसतानाही सरासरीनुसार बिले आली. त्याविरोधात काही ग्राहकांनी महावितरणविरोधात न्यायिक लढा दिला. अशा न्यायिक प्रकरणांतील ग्राहकांनाही बिलातील विवादित असलेल्या संपूर्ण रकमेचा भरणा करावा लागणार आहे. याखेरीज न्यायिक लढ्याचा खर्चदेखील महावितरण ग्राहकांकडून वसूल करणार आहे. अशा ग्राहकांना व्याजाच्या रक्कमेत ५० टक्के सवलत मिळणार आहे.

…तर अधिकाऱ्यांवर कारवाई

ग्राहकांना या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी अनेकदा जवळील उपकेंद्रात जावे लागते. पण त्या ठिकाणी अधिकारी आधी देयक भरा, असा दबाव ग्राहकांवर आणत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशाप्रकारे ग्राहकांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा ऊर्जामंत्र्यांनी दिला आहे.

महावितरणशी ऑनलाइन करार

हप्त्याच्या सुविधेसाठी ग्राहक ऑनलाइन अर्ज करू शकतात. हा अर्ज करताना ग्राहकांना एकूण बिलाच्या (थकबाकीसह) दोन टक्के रकमेचा भरणा करायचा आहे. याखेरीज हप्त्याची ही सुविधा मान्य असल्याचा करार ग्राहकांना महावितरणसोबत करायचा आहे. त्या करारासाठी मुद्रांक शुल्काचे २०० रुपयेही ग्राहकांकडूनच वसूल केले जाणार आहेत.Source link

  • Tags
  • h

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: विराट कोहलीच्या गैरहजेरीमुळे आर्थिक नुकसान? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले उत्तर – nick hockley says virat kohli absence after first test will not affect...

सिडनी: करोना व्हायरसमुळे अनेक क्रिकेट संघटनांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता परिस्थिती हळुहळु सुधारत असून अनेक देशात द्विपक्षीय मालिकांचे आयोजन सुरू आहे....

Recent Comments