Home शहरं मुंबई entertainment industry start: मनोरंजनसृष्टीत 'अ‍ॅक्शन'; चित्रीकरणासाठी परवानगी - after coronavirus pandemic action...

entertainment industry start: मनोरंजनसृष्टीत ‘अ‍ॅक्शन’; चित्रीकरणासाठी परवानगी – after coronavirus pandemic action in entertainment


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प असलेली मनोरंजनसृष्टी आता पुन्हा एकदा लखलखण्यासाठी सज्ज झाली आहे. टीव्ही मालिका आणि सिनेमा क्षेत्राने प्राथमिक स्वरूपात चित्रीकरणाला सुरुवात केली असून, मराठी व्यावसायिक नाट्यसृष्टी देखील प्रकाशमान होण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्य सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता मनोरंजनसृष्टीत पुन्हा एकदा निर्मितीची कामे सुरू झाली आहेत. महिनाभरात कामाचा वेगही वाढण्याची चिन्हे आहेत. उद्या, सोमवार, मंगळवारपासून गोरेगाव चित्रनगरीत हिंदी-मराठी टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. ठाणे येथेही अनेक मराठी मालिकांचे सेट आहेत. त्यांना देखील चित्रीकरणासाठी जिल्हाधीकारी कार्यालयातून परवानगी मिळाली आहे. सोबतच कोल्हापूरमध्येही चित्रीकरणाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. लॉकडाउनमध्ये अनेक हिंदी, मराठी सिनेमांचे पोस्ट प्रॉडक्शन रखडले होते. पण, आता कलाकारांनी स्टुडिओमध्ये जाऊन सिनेमाचे डबिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे गायक मंडळीही गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या कामाला लागली आहेत.

विशेष म्हणजे लॉकडाउनच्या प्रदीर्घ काळानंतर परवानगी आणि नियम-अटी यांचा तालमेळ बसवत अभिनेत्री दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिने तिच्या आगामी ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचे काही अंशी रखडलेले चित्रीकरण दोन दिवसांपूर्वीच पूर्ण केले आहे. ‘मनाचे श्लोक’ सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण मार्च-एप्रिल दरम्यान होणार होते. पण त्याच काळात लॉकडाउन जाहीर झाल्याने चित्रीकरण शक्य नव्हते. अनलॉक-१च्या घोषणेसोबतच चित्रीकरणाला मिळालेली परवानगीही मनोरंजनसृष्टीला दिलासा देणारी होती. त्यामुळे ‘मनाचे श्लोक’च्या २५ जणांच्या टीमने दोन दिवस सर्व नियमांचे पालन करून चित्रीकरण पूर्ण केले. या यशस्वी चित्रीकरणामुळे इतर सिनेनिर्मात्यांना आणि कलाकरांना पुननिर्माणाचा विश्वास मिळाला आहे.

तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही चित्रीकरण करत होतो; त्यात सुरक्षित वावराबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले. कमी जणांच्या युनिटमुळे सेटवर एक व्यक्ती तब्बल तीन जणांचे काम करत होता. कमीत कमी वेळेत आम्ही जास्त काम केले आणि दोन दिवसांतच हे चित्रीकरण आटोपले. – मृण्मयी देशपांडे, दिग्दर्शिका

चित्रनगरी, गोरेगाव : उद्या, सोमवार, मंगळवारपासून चित्रीकरण

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयातून चित्रीकरणासाठी परवानगी

कोल्हापूर : विविध कामांसाठी चित्रपटसृष्टीची पूर्वतयारी पूर्णSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पैशाच्या व्यवस्थापनाचे धडे

जॉन कोलासो तुम्ही श्रीमंत असा की गरीब, हातात असलेल्या कसं करायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अडचणीत सापडणारच! वित्तीय वा आर्थिक...

Raza Academy: रजा अकादमीवर बंदीची मागणी – bjp mla atul bhatkhalkar demands ban on raza academy over spreading communal tension

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील भेंडीबाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यांवर लावून निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही आहे. दहशतवादाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीचा...

आजचं राशीभविष्य… दिनांक ३१ ऑक्टोबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० Source link

Recent Comments