Home आपलं जग करियर eraksha 2020: eRaksha 2020: एनसीईआरटी देतेय इनाम जिंकण्याची संधी - ncert eraksha...

eraksha 2020: eRaksha 2020: एनसीईआरटी देतेय इनाम जिंकण्याची संधी – ncert eraksha 2020 competition


नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने सायबर पीस फाउंडेशन आणि युनेस्कोच्या विद्यमाने ‘ईरक्षा’ eRaksha 2020 स्पर्धा आणली आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे नेटिझन्सना म्हणजे इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांना कोविड १९ पासून सुरक्षित राहण्यासाठी आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. कोविड – १९ शी संबंधित फेक न्यूज आणि चुकीच्या सूचनांपासून कसा बचाव करायचा याबद्दलची माहिती स्पर्धकांनी द्यायची आहे.

ही स्पर्धा तीन भागांत विभागण्यात आली आहे. पहिला विभाग १० वर्षांहून अधिक वयाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी, दुसरा १७ वर्षे वयावरील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी तर तिसरा विभाग शिक्षक, पालकांसाठी आहे. ईरक्षा कार्यक्रमात विविध स्पर्धा आहेत. आर्टकेड, टेक आविष्कारपासून वर्ड हॅक आणि स्क्रीन मास्टर अशा विविध स्पर्धा आहेत. सायबर सिक्युरिटीत विशिष्ट सेवा देणाऱ्यांना सीपी ऑनर्स देण्यात येईल. पुढे दिलेली एनसीईआरटीची लिंक क्लिक करून अधिक माहिती घेता येईल.

आर्टकॅडमध्ये विद्यार्थ्यांना ड्रॉइंग, कॉमिक्स, मीम, स्टीकर्स बनवून पाठवावे लागतील. या माध्यमातून ऑनलाइन सुरक्षेसंबंधी माहिती द्यायची आहे. विद्यार्थी सायबर बुलिंग, विशिंग, मालवेअर आदी विषय निवडता येतील.

आशियातील टॉप १०० शिक्षणसंस्थांमध्ये भारताच्या ८ संस्था

टेक आविष्कारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजीटल नागरिकता आणि ऑनलाइन सुरक्षा या संकल्पनेवर सॉफ्टवेअर, हार्डवेअर किंवा फर्मवेअर तयार करायचे आहे. सायबर स्पेसमध्ये प्रायवसीसंबंधी सुरक्षितता, ट्रोलिंग, ऑनलाइन फ्रॉड आदी समस्यांचा सामना करावा लागतो. आविष्कारमध्ये यापैकी एखाद्या समस्येच निराकरण करायचं आहे.

MHT-CET: बारावी बोर्ड डिटेल्स भरण्यास मुदतवाढ

वर्क हॅक किंवा लेखन स्पर्धेत लघुकथा आणि निबंध लिहायचा आहे. कॉलेजचे विद्यार्थी यात लेख, ब्लॉग किंवा संशोधर पेपर लिहू शकतात. यासाठीदेखील ‘डिजीटल नागरिकता आणि ऑनलाइन सुरक्षा’ हीच संकल्पना आहे.

स्क्रीन मास्टर कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांना माहितीपट बनवायचा आहे आणि मुलाखतही घ्यायची आहे. यात सायबर जगतातील समस्यांचे निराकरण करण्याचे उपाय शोधायचे आहेत.

ज्या लोकांना ऑनलाइन सुरक्षिततेसाठी काम केलं आहे, ते स्वत:च सायबर पीस ऑनर्स अवॉर्डसाठी नोंदणी करू शकतात. विजेत्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे. eraksha.net साठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments