Home देश पैसा पैसा facts related 20 lakh crore: २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे या गोष्टी...

facts related 20 lakh crore: २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे या गोष्टी – economic package of modi government you must interesting facts related 20 lakh crore


तुम्हाला माहिती आहे का २० लाख कोटीमध्ये किती शून्य असतात किंवा जर इतके पैस देशातील १३५ कोटी लोकांमध्ये वाटले तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? हे प्रश्न आम्हाला नाही तर देशभरातील जनतेला पडत आहेत आणि ते याची उत्तरे गुगलवर शोधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमधील पडझडीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर या पॅकेजचा तपशील अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिला. भारत सरकारने दिलेले हे पॅकेज जी-२० देशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे आर्थिक पॅकेज आहे. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या १० टक्के इतकी आहे. जाऊन घेऊयात या आर्थिक पॅकेजबद्दलच्या रंजक गोष्टी…

​२० लाख कोटीत किती शून्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या या आत्मनिर्भर पॅकेजवर देशभरातील राजकीय नेते आणि अर्थशास्त्रज्ञ चर्चा करत आहेत. पण या पॅकेज संदर्भात सर्वात जास्त उत्सुकता लागलेली एक गोष्ट म्हणजे २० लाख कोटी रुपयात किती शून्य असतात ही होय. अनेक भारतीय नेटिझन्स २० लाख कोटीत किती शून्य असतात याचा शोध इंटरनेटवर घेत आहेत. तर या रक्कमेत १३ शून्य असतात. ही संख्या अंकात २०,०००,०००,०००,००० अशी लिहली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या १० टक्के ही रक्कम आहे.

​प्रत्येकाला किती रुपये मिळतील…

maharashtra times

पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या या पॅकेजवर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. याआधी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काळा पैसा भारतात आला तर प्रत्येक नागरीकाला किती पैसे मिळतील याची चर्चा झाली होती. आता या आर्थिक पॅकेजमधील २० लाख कोटी रुपये प्रत्येक नागरिकाला वाटले तर किती पैस मिळतील याची चर्चा सुरू झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला २० लाख कोटी रुपये समान पद्धतीने वाटले तर १३५ कोटी नागरिकांना प्रत्येकी १४ हजार ८१५ रुपये इतके पैसे मिळतील.

​पाकच्या बजेटपेक्षा मोठी रक्कम

maharashtra times

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारतासाठीचे पॅकेज हे जी-२० देशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे आर्थिक पॅकेज आहे. पाकिस्तानच्या आर्थसंकल्पापेक्षा ही रक्कम सहा पट मोठी आहे. २०१९-२० सालचे पाकिस्तान सरकारचे बजेट ७.०२२ ट्रिलियन पाकिस्तानी रुपये इतके होते. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम ३.३० लाख कोटी इतकी होते. म्हणजेच आत्मनिर्भर पॅकेज हे पाकच्या बजेटपेक्षा सहा पट मोठे आहे. या पॅकेजमध्ये पाकच्या ६ अर्थसंकल्पाचा समावेश होईल.

​देशात १८ बुलेट ट्रेन सुरू होतील

maharashtra times

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १.०८ लाख कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. केंद्राने करोना विरुद्धच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जाहीर केलेले २० लाख कोटी रक्कम बुलेट ट्रेनवर खर्च केले तर देशात १८ मार्गावर अशा रेल्वे धावतील. मुंबई-अहमदाबाद अशा १८ मार्गावर बुटेल ट्रेनचे स्वप्न या पॅकेजमधील रक्कमेत पूर्ण होऊ शकते. भारताशिवाय जपान, अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया सरकारने असे पॅकेज याआधी दिले आहे.

​देशात ६६६ जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी

maharashtra times

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या २० लाख कोटी रुपयांचा वापर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्मितीसाठी वापरला तर देशातील जवळपास सर्व जिल्ह्यात असे पुतळे उभे राहतील. सरकारद्वारे गुजरातमध्ये सरदार पटेल यांची प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी ३० कोटी रुपये इतका खर्च आला होता. देशात ७३५ जिल्हे आहेत. २० लाख कोटी रुपयांचा वापर यासाठी केला तर ६६६ जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करता येतील.

​जगातील ५वे मोठे पॅकेज

maharashtra times

भारत सरकारने दिलेले हे पॅकेज जी-२० देशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे आर्थिक पॅकेज आहे. द वीकने दिलेल्या रिपोर्टनुसार जपानने दिलेले पॅकेज सर्वात मोठे आहे. ते पॅकेज त्यांच्या जीडीपीच्या २१.१ टक्के इतके आहे.त्यानंतर अमेरिकेचे असून ते त्यांच्या जीडीपीच्या १३.३ टक्के इतके, तर ऑस्ट्रेलियाचे पॅकेज जीडीपीच्या १०.८ टक्के इतके आहे. चौथ्या क्रमांकावर जर्मनीने जाहीर केलेले पॅकेज असून ते त्यांच्या जीडीपीच्या १०.७ टक्के इतके आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sensex rise today: Sensex Today शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला – sensex surge today reclaim 50000 mark

हायलाइट्स:भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे.सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून त्याने ५०१०० अंकाची पातळी ओलांडलीराष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे खंडीत...

nana patole latest news: Nana Patole: महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येणार!; नाना पटोले यांनी केले ‘हे’ मोठे विधान – congress will come to power in...

हायलाइट्स:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावला बैठकांचा धडाका.पालिका निवडणुकीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना.आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येईल: पटोलेमुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नव्या दमाचे...

coronavirus in mumbai latest news: Coronavirus In Mumbai: मुंबईत ४ महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ; ‘हे’ आकडे टेन्शन वाढवणारे – mumbai records 1167 covid 19 cases...

हायलाइट्स:मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला.मुंबईत झाली चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ.ठाणे जिल्ह्यातही नवीन ६१४ रुग्णांची पडली भर.मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील करोना संसर्गाचा...

Recent Comments