Home महाराष्ट्र Fadnavis on Wadhawan's Case: वाधवान प्रकरणाची सीबीआय चौकशी करा: फडणवीस - devendra...

Fadnavis on Wadhawan’s Case: वाधवान प्रकरणाची सीबीआय चौकशी करा: फडणवीस – devendra fadnavis demands cbi inquiry in wadhawan’s lockdown violation case


नागपूर: लॉकडाऊनच्या काळात दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंना प्रवासाची मुभा देणारे गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट देण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाजपनं टीकास्त्र सोडलं आहे. वाधवान बंधूंना मुभा देण्यामागे सरकारमधील बड्या नेत्यांचाच हात असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी केली आहे. (Devendra Fadnavis on Wadhawan’s Case)

मुख्यमंत्री कमी पडताहेत असं म्हणालोच नव्हतो: पृथ्वीराज चव्हाण

करोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना व कुणालाही बाहेर पडण्याची मुभा नसताना वाधवान बंधूंना सहकुटुंब खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासाची मुभा देण्यात आली होती. ‘माझे फॅमिली फ्रेंड’ असा उल्लेख करत गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच गाड्यांसाठी विशेष पास इश्यू केला होता. या सर्वांना कौंटुबिक अत्यावश्यक कारणासाठी महाबळेश्वरला जायचं आहे, असंही त्यावर नमूद करण्यात आलं होतं. ही बाब समोर आल्यानंतर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र, आता गुप्ता यांची पुन्हा त्याच जागेवर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून फडणवीस यांनी सरकारला घेरलं आहे.

‘एखादा अधिकारी अशा प्रकारे स्वत:च्या अधिकारात इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. कोणाच्या तरी इशाऱ्यावरून किंवा आदेशानंच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, हे आमचं म्हणणं आता खरं ठरल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘ज्या वेगानं गुप्ता यांना क्लिन चिट देण्यात आली, त्यावरून सरकार चालवणाऱ्यांच्या आशीर्वादानंच वाधवान बंधूंना पास दिला गेला होता हे स्पष्ट झालंय. हे आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार असा प्रश्न आम्हाला पडलाय. त्यामुळंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

…तसं असेल तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे: आव्हाडSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray without mask: Nashik: मास्क न घालताच राज ठाकरे नाशिकमध्ये; माजी महापौरांना म्हणाले… – mns chief raj thackeray in nashik without wearing mask

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मास्क न घालताच ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचले. मास्कवर मास्क घालून स्वागतासाठी...

chandrkant patil on maratha reservation: नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जा; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा – chandrkant patil attacks on maharashtra government over maratha...

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन भाजप आक्रमकभाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सरकारला इशारामराठा आरक्षणाचा मुद्द्यांवरुन राजकारण तापलं मुंबई: सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतचं नाही....

farmers protest in france: Farmers protest फ्रान्समध्येही शेतकऱ्यांचा एल्गार, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी – french farmers protest against low earnings deplore high suicide...

हायलाइट्स:फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी सुपरमार्केट्स आणि वितरण केंद्राबाहेर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलनमागील वर्षी मंजूर झालेल्या कृषी कायद्यामुळेही दिलासा...

Recent Comments