Home शहरं मुंबई fake TRP case: अर्णव गोस्वामींची उच्च न्यायालयात धाव - fake trp case...

fake TRP case: अर्णव गोस्वामींची उच्च न्यायालयात धाव – fake trp case : arg outlier media and journalist arnab goswami move to bombay high court


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीची कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अखेर शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर आता उद्या, सोमवारी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या पीठाने गुरुवारी कंपनीला फटकारले होते. ‘तुमच्या वरळीमधील कार्यालयापासून मुंबई उच्च न्यायालय अगदीच जवळ आहे. त्यामुळे उच्च न्यायालयावर विश्वास ठेवा आणि तिथे आधी दाद मागा’, अशा शब्दांत पीठाने सुनावले होते. तसेच उच्च न्यायालयात याचिका करण्याची मुभा देऊन कंपनीची याचिका फेटाळली होती. त्यानंतर कंपनीने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेऊन मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करावा, अशी विनंती याचिकेत केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कंपनीची बाजू ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी मांडली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पुनर्विकासातील अडथळे झाले दूर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या सुमारे १४ हजार २३३ उपकरप्राप्त करून तेथील हजारो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी...

Aurangabad Municipal Corporation: पालिका प्रशासकपदी पांडेय कायम – astik kumar pandey retains as aurangabad municipal corporation chief till election

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादनिवडणूक होईपर्यंत महापालिकेवर प्रशासक कायम राहणार आहे. त्यामुळे विद्यमान प्रशासक आस्तिककुमार पांडेय प्रशासकपदी कायम राहतील असे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या...

निष्काळजीपणाचा बळी!

म. टा. वृत्तसेवा, सिडको सिडकोतील भूमिगत तारांचा विषय नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. विद्युत तारा भूमिगत केल्या नाही म्हणूनही अपघात होतात, तर विद्युत तारा भूमिगत...

Recent Comments