Home क्रीडा false rape against akhtar: या खेळाडूवर बोर्ड आणि कर्णधाराने केला होता बलात्काराचा...

false rape against akhtar: या खेळाडूवर बोर्ड आणि कर्णधाराने केला होता बलात्काराचा खोटा आरोप! – shoaib akhtar says pcb and captain false accusation of rape against me


नवी दिल्ली: २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढले नाही, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते, असा मोठा गौप्यस्फोट शोएब अख्तरने केला. हेलोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हेलो लाइव्हवर तो बोलत होता.

वाचा- करोनाग्रस्तांसाठी ‘या’ क्रिकेटपटूंनी केले रक्तदान!

अख्तर म्हणाला, आजपर्यंत त्यांनी हे आरोप मागे घेतले नाही. पाक संघातील खेळाडूच्या एका चुकीमुळे हे खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले आणि मला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मी हा प्रसंग कधीच कोणत्या मीडियामध्ये प्रसिद्ध केला नाही, पण आज मी हा प्रसंग Helo वर सांगतोय असे तो म्हणाला.

वाचा- IPLमध्ये वर्णद्वेष; सॅमीच्या आरोपांना BCCIने दिले उत्तर

पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि संघातील खेळाडू अनेकदा माझ्या मीडियातील प्रसिद्धीमुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे पण मला मिळालेली प्रसिद्धी आणि यश हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. मला त्रास देणारे ते खेळाडू आज नामशेष आहे तर मला आजही संपूर्ण क्रिकेटविश्वात ओळखले जाते. तसेच भारतातही मला कधी द्वेषाला सामोरे जावे लागले नाही. भारतात मला नेहमी प्रेम मिळाले आहे.

वाचा- … तर बीसीसीआयने IPLचे आयोजन करावे!

या लाईव्हमध्ये शोएबने विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीचे आहे असे सांगितले, शोएबच्या मते विराटला कसोटी, एकदिवसीय सामने मोठ्या प्रमाणात खेळण्याची संधी मिळते. पण पाकिस्तानात आता क्रिकेटची परिस्थिती बेताची आहे. खेळाडूंना म्हणावी तशी संधी उपल्बध होत नाही. पाकिस्तान क्रिकेटच्या तिजोरीत खडखडाट असल्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची जास्त संधी मिळत नाही. त्यामुळे विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीची आहे. दोन्ही खेळाडू आपआपल्या जागेवर उत्तम कामगिरी करत असून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहे.

वाचा- ‘सचिनला बाद केले म्हणून मला आणि अंपायरला जीवे मारण्याची धमकी’

शोएबने भारतीय कर्णधारांविषयी बोलताना सांगितले की, जर आज महेंद्रसिंग धोनीने संघाला नाव मिळवून दिले तर सौरव गांगुलीने भारताच्या संघाचा पाया रचला होता. सौरवने भारतीय संघासाठी त्यावेळी योग्य निर्णय घेतले. आधी पाकिस्तान संघ भारताला सहज हरवून जायचा पण सौरवने तयार केलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला अनेकवेळा पराभूत करुन स्व:ताला सिद्ध केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments