Home ताज्या बातम्या Families in Hyderabad Refuse to Take Back corona Survivors People Re admitted...

Families in Hyderabad Refuse to Take Back corona Survivors People Re admitted to Hospital mhpl | Coronavirus-latest-news


रुग्णालयाच्या गेटवर आपल्या कुटुंबाची वाट प्रतीक्षा करून ते थकले. आता जायचं तरी कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

ऋषिका सदाम/तेलंगना, 25 जून : आपल्या जवळच्या व्यक्ती, आपलं कुटुंब आपली वाट पाहत आहे, आपल्याला त्यांच्याकडे लवकरात लवकर जायचं आहे. असा दृढनिश्चय करून त्यांनी कोरोनाव्हायरसशी दोनहात केले. अखेर कोरोनाव्हायरशी त्यांनी लढा जिंकला. आता आपण आपल्या घरी पुन्हा जाणार याची उत्सुकता त्यांना होती. मोठ्या आशेने आपल्याला कुणीतरी न्यायाला येईल याची ते वाट पाहत होते. मात्र कुणीच आलं नाही.

अशी परिस्थिती सध्या हैदराबादच्या गांधी रुग्णालयातील (Hyderabad’s Gandhi hospital) अनेक कोरोना रुग्णांची (coronvirus patient) आहे. ज्यांनी कोरोनाव्हायरसला तर हरवलं मात्र कुटुंबाने त्यांना नाकारलं. परिणामी बरे झाल्यानंतरही पुन्हा कोरोना रुग्णालयात दाखल (Re-admitted) होण्याची वेळ या रुग्णांवर ओढावली. 50 पेक्षा अधिक कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना त्यांचे कुटुंब पुन्हा स्वीकारण्यास तयार नाहीत.

या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेऊन बऱ्या झालेल्या 93 वर्षांच्या आजी आपला मुलगा आपल्याला न्यायला येईल याची वाट पाहत आहेत. त्यांच्यासारखे अनेक जण डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयाच्या गेटवर आपल्या नातेवाईकांची वाट पाहून थकले आणि पुन्हा रुग्णालयात आले. आता जायचं तरी कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले.

हे वाचा – Corona Update: राज्यात विक्रमी संख्येने रुग्ण बरे; पण नवीन रुग्णांचा नवा विक्रम

दहा ते पंधरा दिवस उपचार घेऊन बरे झाल्यानंतर या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालय प्रशासनाकडून या रुग्णांच्या कुटुंबाला वारंवार फोन केले जात आहेत. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया येत नाही.

गांधी हॉस्पिटलमधील नोडल ऑफिसर डॉ. प्रभाकर राव यांनी सांगितलं, “हे सर्व रुग्ण आता हेल्दी आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणं नाहीत. आम्ही त्यांना डिस्चार्ज दिला आहे आणि ते होम क्वारंटाइनसाठी ते फिट असल्याचं सांगितलं. तरीदेखील त्यांचं कुटुंब त्यांना घरी नेण्यास तयार नाही”

हे वाचा – कोरोनामुळे वडिलांचा झाला मृत्यू, आता मुलगा मोफत वाटतोय रामबाण औषध!

काही रुग्णांच्या कुटुंबांनी त्यांना घरी नेण्यापूर्वी टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आहे ते दाखवा अशी मागणी केल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. मात्र आयसीएमआरच्या गाइडलाइन्सनुसार लक्षणं नसलेले आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांची लक्षणंही पूर्णपणे बरी झाली, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर डिस्चार्जपूर्वी त्यांच्या टेस्ट करण्याची गरज नाही.

नाव न घेण्याच्या अटीवर रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टराने सांगितलं, “कोविडबाबत खूप गैरसमज आहे. जर रुग्णाला आपण घरी नेले, तर आपल्यालाही व्हायरसची लागण होईल अशी भीती लोकांना वाटते. याच भीतीमुळे लोक आपल्या रुग्णाला घरी घेऊन जाण्यास तयार नाही”

हे वाचा – बापरे! तासनतास बसून पाठीत झाली गाठ; WORK FROM HOME चा गंभीर दुष्परिणाम

आता या रुग्णांपैकी वयस्कर रुग्णांना रुग्णालयातच राहण्यासाठी बेड्स देण्यात आलेत आणि काही जणांना नेचर क्युर हॉस्पिटल ज्याचं क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे, तिथं पाठवण्यात आलं.  रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या पाहता बऱ्या झालेल्या रुग्णांची पुन्हा टेस्ट करणं किंवा त्यांना रुग्णालयात पुन्हा दाखल करणं खूप कठीण झालं आहे.

संपादन – प्रिया लाड

First Published: Jun 25, 2020 10:29 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: कंगनाला २२ मार्चपर्यंत अटक करू नका; हायकोर्टाचे निर्देश – kangana ranout and rangoli chandel maintained interim protection from arrest

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेत्री कंगना रणौट व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी...

Iqbal Mirchi: मुंबई : मिर्चीचे कुटुंबीयही ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ – court declares iqbal mirchi’s family members fugitive economic offenders

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दिवंगत निकटवर्तीय व कुख्यात गँगस्टर इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची याची पत्नी हाजरा तसेच मुले आसिफ व...

Recent Comments