Home शहरं कोल्हापूर farmer killed: जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू - kolhapur...

farmer killed: जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू – kolhapur farmer killed in clash over land dispute


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: शेतीच्या वादातून नंदगाव (ता. करवीर) येथे बुधवारी (ता. ३) दुपारी दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील जखमी शेतकरी फकरुद्दीन बाबासो मुजावर (वय ४५) यांचा गुरुवारी (ता. ४) सकाळी उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला.

या प्रकरणी संदीप बाळू चौगुले (वय ३८), त्याचा भाऊ सागर आणि वडील बाळू दादू चौगुले (सर्व रा. नंदगाव) यांच्यावर इस्पुर्ली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. इस्पुर्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदगाव येथे राहणारे मुजावर व चौगुले कुटुंबात शेतजमिनीचा वाद सुरू आहे. बुधवारी सकाळी फकरुद्दीन शेख, त्यांची पत्नी तबस्सुम, भाऊ जिशान, चुलत भाऊ निहाल, चुलती जमिला असे सर्वजण शेतात उसाची लागवड करण्यासाठी गेले होते. यावेळी चौगुले कुटुंबीयांनी त्यांच्याशी वाद घालून या शेतात का आलात? अशी विचारणा केली. संशयितांनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने फकरुद्दीन मुजावर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले होते. प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मारहाण करणारा संदीप बाळू चौगुले (वय ३८) याला पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

बहिणींवर सामूहिक बलात्कार; फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वच हादरले

आईनं दुसरं लग्न केल्याचा मनात होता राग; मुलानं केली सावत्र बापाची हत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पावसाची विश्रांती; आता सुरू होणार पॅचवर्क

म. टा. प्रतिनिधी, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता महापालिका पॅचवर्कच्या कामाकडे लक्ष देणार आहे. पुणे येथील एका कंपनीच्या मदतीने पॉलिमर तंत्रज्ञान वापरून महापालिकेच्या स्तरावर...

fyjc online admissions 2020: अकरावी प्रवेश लांबणीवर? विद्यार्थ्यांची आणखी चार आठवडे रखडपट्टी – fyjc online admissions 2020 uncertainty over fyjc online admissions continue due...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सर्वोच्च न्यायालयाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण प्रवेशात मराठा आरक्षण लागू करू नये, असे निर्देश देऊन मराठा आरक्षण...

Samsung Galaxy S21 series: सॅमसंगच्या या फोन्ससोबत मिळणार नाहीत चार्जर आणि इयरफोन – samsung galaxy s21 series may ship without in-box charger, headphones: report

नवी दिल्लीः अॅपलने नुकतीच आयफोन १२ सीरीज सोबत चार्जर आणि इयरपॉड्स न देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयाची अनेक ब्रँड्सने खिल्ली उडवत...

Recent Comments