Home देश farmers protesting at singhu border: शेतकरी आक्रमक; दिल्ली सीमेसह अनेक ठिकाणी कृषी...

farmers protesting at singhu border: शेतकरी आक्रमक; दिल्ली सीमेसह अनेक ठिकाणी कृषी कायद्यांच्या प्रति जाळल्या – farmers protesting at singhu border burn copies of the farm laws


नवी दिल्लीः दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी लोहरी निमित्त बुधवारी संध्याकाळी सिंघू सीमेवर कृषी कायद्यांच्या ( farmers burn copies of the farm laws ) प्रती जाळल्या.

नवे तीन कृषी कायदे आणि वीज बिल २०२० रद्द करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीवर सरकारची भूमिका कठोर आहे. यामुळे सरकारविरोधातील आंदोलनाला वेग देत देशभरात २० हजाराहून अधिक ठिकाणी कृषी कायद्याच्या प्रती जाळल्या. सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी कायद्याच्या प्रती जाळल्या आणि ते रद्द करण्यासाठी घोषणा दिल्या, असं किसान समितीने म्हटले आहे.

प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी सीमेवर एकत्र येण्याचं आवाहन किसान समितीने दिल्लीच्या सभोवतालच्या ३०० किलोमीटरच्या परिघात असलेल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलं आहे. १८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांत महिला शेतकरी दिन साजरा केला जाईल. बंगालमध्ये २० ते २२ जानेवारी, बंगालमध्ये २४ ते २६ जानेवारी, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश २३ ते २५ जानेवारी आणि ओडिशामध्ये २३ जानेवारीला राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले जाईल.

कृषी कायदे: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सिद्धू म्हणाले, ‘कोणतीही मध्यस्थी…’

हवाई दलाला मिळणार ८३ तेजसचं बळ, ४८ हजार कोटींची डील

हे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी कसे फायद्याचे आहेत हे सांगण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, असं एआयकेएससीसी म्हटलं आहे. तर या आंदोलनाला ५० हून अधिक दिवस झाले आहेत. नवीन कृषी कायद्यांमुळे तंत्रज्ञान विकास, भांडवलाची गुंतवणूक, दरवाढ होईल, असा केंद्राचा युक्तिवाद आहे. पण जर या कायद्यांनी या कामांची जबाबदारी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना दिली तर हा कायदा निरर्थक ठरेल, असं एआयकेएससीसी सांगितलं. कॉर्पोरेटकडून गुंतवणूक होईल तेव्हा त्यांच लक्ष्य हे अधिक नफा मिळवणं, जमीन आणि जलस्रोतांवर संपादन करणं असेल, असं एआयकेएससीसीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India vs Australia Scorecard: Australia All Out On 294 Runs On Day 4 Of 4th And Final Test In Brisbane, India Required 324 Runs...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताने ३०० धावांच्या आतमध्येच रोखले. मोहम्मद सिराजने...

Recent Comments